जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेकडून इम्रान खानला मोठा झटका, जॉन केरी भारतात येणार मात्र पाकिस्तानात जाण्यास नकार

अमेरिकेकडून इम्रान खानला मोठा झटका, जॉन केरी भारतात येणार मात्र पाकिस्तानात जाण्यास नकार

अमेरिकेकडून इम्रान खानला मोठा झटका, जॉन केरी भारतात येणार मात्र पाकिस्तानात जाण्यास नकार

हवामान बदलावर (Climate Change) अमेरिकेचे विशेष दूत भारत, बांगलादेशला भेट देणार आहेत. मात्र, या संकटाचा सर्वाधिक सामना करणाऱ्या देशांच्या यादीत सामील असलेल्या पाकिस्तानात ते जाणार नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंगटन 02 एप्रिल : चीनसोबतची (China) जवळीक पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा महागात पडत असल्याचं चित्र आहे. चीनसोबतच्या जवळीकीनं पाकिस्तानला अमेरिकेपासून (America) दूर केलं आहे. याच कारणामुळे आता अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन यांनी पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. हवामान बदलावर (Climate Change) अमेरिकेचे विशेष दूत भारत, बांगलादेशला भेट देणार आहेत. मात्र, या संकटाचा सर्वाधिक सामना करणाऱ्या देशांच्या यादीत सामील असलेल्या पाकिस्तानात ते जाणार नाहीत. हवामान संकटावर चर्चा करण्यासाठी जॉन केरी (John Kerry) एक ते 9 एप्रिल या काळात बांगलादेश, भारत आणि यूएईला भेट देणार आहेत. मात्र, पाकिस्तानात जाण्यास अमेरिकेनं नकार दिला आहे. इम्रान खानला हवामान बदलावरील शिखर परिषदेचं निमंत्रण न दिल्याने पाकिस्तानचा पुन्हा एकदा जगासमोर अपमान झाला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आशियाई बाबींविषयी अमेरिकेचे तज्ज्ञ माइक कुगेलमन म्हणाले, पाकिस्तानला व्हाईट हाऊसच्या जागतिक हवामान बदल संमेलनात आमंत्रित केलेले नाही. अमेरिकेचे हवामान दूत जॉन केरी भारत आणि बांगलादेश येथे चर्चा करण्यासाठी येत आहेत. केरी यांनी याबाबत ट्विट करतं म्हटलं आहे, की हवामान संकटापासून वाचण्यासाठी अमिरात, भारत आणि बांगलादेशमधील मित्रांसोबत चर्चेसाठी उत्साही आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील 40 नेत्यांना हवामान बदलासोबत लढा देण्यासाठी आयोजित नेत्यांच्या शिखर संमेलनासाठी आमंत्रित केलं आहे. या संमेलनात हवामान बदलापासून वाचण्यासाठी ठोसं पावलं उचलण्यााबाबत तसंच इतर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात