नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी: देशात अनेक कंपन्या खरेदीदारांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यातीलच एक सेवा म्हणजे ‘buy now pay later’ ची सेवा. म्हणजेच आता खरेदी करा आणि बिल नंतर भरा. अनेक ऑनलाईन कंपन्या आपल्या ग्राहकांना नव नव्या सेवा देत असतात. त्यातीलच एक कंपनी म्हणजे ‘मोबिक्विक’(mobikwik). याद्वारे ग्राहकांना एका मर्यादेपर्यंतची खरेदी करता येणार आहे.
कंपनीच्या या सेवेला त्यांनी ‘जीप’ असं नाव दिलं आहे. याअंतर्ग एका रकमेची मर्यादा घालून दिली जाईल. त्या मर्यादेपर्यंत तुम्हाला खरेदी करता येणार आहे. आणि त्याची रक्कम 15 दिवसानंतर भरता येणार आहे.
‘मोबिक्विक’मध्ये जीपद्वारे पैसेही लोड करू शकता-
जीपची सुविधा काही ठराविक वापरकर्त्यांनाच देण्यात येते. जीपद्वारे तुम्हाला किती खरेदी रक्कम देण्यात येईल हे तुमच्या ट्रान्झक्शन बिहेविअरवर अवलंबून असत. जीपचा वापर मिबिक्विकमध्ये तसेच मोबिक्विकद्वारे रक्कम स्वीकारणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांसाठी करू शकता.
(हे पहा:केवळ 4,662 रुपयांत खरेदी करा सोनं, मोदी सरकार देत आहे स्वस्त सुवर्णखरेदीची संधी)
अमेरिकन वर्च्युअल कार्डद्वारेही करू शकता जीपचा वापर-
जे व्यापारी ‘मोबिक्विक’ द्वारे खरेदी रक्कम स्वीकारत नाहीत. त्याठिकाणी सुद्धा जीपचा वापर करू शकता त्यासाठी आधी जीपद्वारे कार्डवर पैसे लोड करावे लागणार. उदाहरणार्थ अमेझॉनवरसुद्धा मोबिक्विकची सुविधा नाही. अशावेळी अमेरिकन वर्च्युअल पद्धतीचा वापर करून अमेझॉनवर खरेदी करू शकता.
‘जीप’ बिल पेमेंट-
तुम्ही जीपद्वारे 1 ते 15 या दिवसांत खरेदी केलेल्या रकमेचा बिल 16 तारखेला जनरेट होतो. त्यानंतर 16 ते 20 या दिवसंतर्गत हे पैसे भरावे लागतात. तसेच 15 ते 30 किंवा 31 या दिवसांत केलेल्या खरेदीची रक्कम पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला जनरेट होते. ती रक्कम 1 ते 5 या दिवसांत भरावी लागते. लक्षात ठेवा आलेलं बिल या दिलेल्या वेळेत भरला नाही तर दंड होऊ शकतो. त्यामुळे दिलेल्या वेळेत रक्कम भरावी लागते.