• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Online Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट? वाचा काय आहे नियम

Online Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट? वाचा काय आहे नियम

गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन बँकिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ऑनलाइन बँकिंग सुविधेचा वापर करून आपण किती दिवसांचे अकाउंट स्टेटमेंट मिळवू शकतो, याची तुम्हाला माहिती आहे का?

  • Share this:
मुंबई, 21 सप्टेंबर: ऑनलाइन बँकिंगचे (online banking) प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन व्यवहारांना (online transaction) चालना मिळावी यासाठी बँका सुद्धा सतत प्रयत्नशील असतात. कोरोना काळात तर अनेकजण पैशांची देवाण-घेवाण करताना प्रत्यक्ष हातामध्ये पैसे घेण्यापेक्षा ऑनलाइन पैसे पाठवा, असे सांगतात. ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विविध अॅप (online money transfer app) देखील उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन बँकिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ऑनलाइन बँकिंग सुविधेचा वापर करून आपण किती दिवसांचे अकाउंट स्टेटमेंट मिळवू शकतो, याची तुम्हाला माहिती आहे का? ऑनलाइन बँकिंगद्वारे ऑनलाइन स्टेटमेंट मिळवण्याबाबत काही नियम आहेत. आता ऑनलाइन सुविधेमुळे बँकिंग करणं खूप सोपं झालं आहे. एखाद्याच्या खात्यात पैसे पाठवण्यापासून ते नवीन खातं उघडण्यापर्यंत काम आता मोबाईल बँकिंगद्वारे करता येते. खूप कमी अशी आर्थिक कामे राहिली आहेत, की ज्याच्यासाठी बँकेत जाणं आवश्यक आहे. बँकेची बहुतेक कामे ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरून घर बसल्या करता येतात. तसेच बँकांनी ऑनलाईन बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी काही सुविधांचे शुल्कदेखील वाढवलं असून या सुविधा ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून घेतल्यास त्याचे शुल्क माफ केले आहे. अकाउंट स्टेटमेंटसाठी बँकेचे काही नियम आहेत. हे वाचा-Gold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं जर बँकेत जाऊन अकाउंट स्टेटमेंट घेतले तर त्यासाठी शुल्क भरावे लागते. पण ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून अकाउंट स्टेटमेंट मोफत मिळवता येते. परंतु, जर कोणाला खूप जुने स्टेटमेंट हवे असेल तर ते ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरून मिळू शकत नाही. ऑनलाइन बँकिंगची सुविधा वापरून अकाउंट स्टेटमेंट डाऊनलोड करण्याचे काय नियम आहेत, ते जाणून घेऊयात. जर 5 वर्षांच्या पूर्वीचे अकाउंट स्टेटमेंट हवे आहे, तर ते ऑनलाइन बँकिंग सुविधेद्वारे मिळू शकत नाही. अलीकडेच बँकेच्या एका ग्राहकाला 10 वर्षांपूर्वीचं अकाउंट स्टेटमेंट लागत होते, परंतु त्याला ते ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरून डाउनलोड करता आले नाही. ट्विटरद्वारे तक्रार केल्यावर, एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांना उत्तर आले की, यासाठी त्यांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. याचाच अर्थ अधिक जुन्या स्टेटमेंटसाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल. ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरून एसबीआयच्या वेबसाईटवरून 3 वर्ष जुने अकाउंट स्टेटमेंट मिळवता येते. त्यापेक्षा जुने स्टेटमेंट हवे असेल तर त्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागतो. मात्र, बँकेकडून कोणतेही स्टेटमेंट काढले तर त्यासाठी शुल्क भरावे लागते. हे वाचा-अदानी समूह खरेदी करणार NDTV? चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर ईमेलद्वारे अकाउंट स्टेटमेंट मागितले तर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परंतु, जर अकाऊंट स्टेटमेंटची प्रत बँकेतून घ्यायची असेल तर प्रती पेज 44 रुपये आणि त्यावर जीएसटी भरावा लागेल. त्याचबरोबर चालू खात्याचे (current account) स्टेटमेंट घेताना एका पानासाठी 100 रुपये मोजावे लागतील. चालू खात्यासाठी एका महिन्याचे अकाउंट स्टेटमेंट मोफत मिळेल. डुप्लिकेट स्टेटमेंटसाठी शुल्क 100 रुपये आहे. पासबुक डुप्लिकेट घेण्यासाठी शुल्क 100 रुपये आहे. बचत खाते बंद करण्याच्या शुल्काचा विचार केल्यास, खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आत ते खाते बंद केल्यास शुल्क शून्य आहे. 14 दिवसांनंतर 1 वर्षाच्या आत खाते बंद केल्यास 500 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क द्यावे लागेल. ऑनलाइन बँकिंग करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी आपल्याला खूप जुने स्टेटमेंट मिळवायचे असेल तर त्यासाठी बँकेत जाण्याची गरज पडतेच.
First published: