मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता नाही रडवणार कांदा! किंमती नियंत्रणात आणण्यासाठी NAFED ने उचललं मोठं पाऊल

आता नाही रडवणार कांदा! किंमती नियंत्रणात आणण्यासाठी NAFED ने उचललं मोठं पाऊल

शनिवारी नाफेडने (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांदा पुरवठा करण्यासाठी आयातदारांकडून निविदांची मागणी केली आहे.

शनिवारी नाफेडने (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांदा पुरवठा करण्यासाठी आयातदारांकडून निविदांची मागणी केली आहे.

शनिवारी नाफेडने (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांदा पुरवठा करण्यासाठी आयातदारांकडून निविदांची मागणी केली आहे.

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : सरकारकडून  कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. परंतू सामान्यांना कांदा अद्यापही रडवतच आहे. दरम्यान नाफेडबाबत अशी माहिती समोर येते आहे की, नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India)ने नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांदा पुरवठा करण्यासाठी आयातदारांकडून निविदांची मागणी केली आहे. देशातील कांद्यांच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणणे आणि देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.

आयातदार किमान 2000 टन पुरवठा करण्यासाठी बोली लावू शकतात

नोव्हेंबर 2020 पर्यंत नाफेडने कोणत्याही देशातून 40 ते 60 मिलीमीटर आकाराच्या लाल कांद्याचा पुरवठा करण्यासाठी निविदा सादर केली आहे. या कांद्याची किंमत प्रति किलो 50 रुपयांपर्यंत असावी.

(हे वाचा-पुढील महिन्यापासून या बँकेत पैसे जमा करण्यासाठीही द्यावे लागणार शुल्क?)

निविदेनुसार आयातदार किमान 2 हजार टन पुरवठा करण्यासाठी बोली लावू शकतात.  500 टनच्या अनेक लॉटमध्ये ते उपलब्ध करुन दिले जाऊ शकतात. दरम्यान आयातदारांना 4 नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. याच तारखेला या टेंडरअंतर्गत आलेल्या बोली जाहीर केल्या जातील. आयातदारांना कांदला बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरात पुरवठा करावा लागणार आहे.

नाफेडने याकरता घेतला हा महत्त्वाचा निर्णय

नाफेडचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एसके सिंह यांनी सांगितले की, आम्ही 15 टन आयात केलेल्या लाल कांद्याच्या पुरवठ्यासाठी निविदा काढली आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा करण्यासाठी याची मदत होईल'.

(हे वाचा-नोव्हेंबरमध्ये दिवाळीव्यतिरिक्त या दिवशीही असणार बँका बंद, सुट्टीची यादी तपासून)

ते म्हणाले की संबंधित निविदांचे  मूल्यमापन गुणवत्ता आणि लवकरात लवकर केलेला पुरवठा याआधारे केले जाईल. निविदाकारांना ताजे, चांगले वाळलेले आणि खराब नसलेल्या कांद्यांचा पुरवठा करावा लागेल, असही ते म्हणाले.

First published:

Tags: Onion, Priceonion