नोव्हेंबरपासून या बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क? वाचा काय आहे सत्य

नोव्हेंबरपासून या बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क? वाचा काय आहे सत्य

मीडिया अहवालांच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, बँक ऑफ बडोदाने पैसे काढण्यासंदर्भातील आणि पैसे जमा करण्यासंदर्भातील नियम बदलले आहेत. पण हा दावा साफ खोटा असल्याची PIB Fact Check ने स्पष्ट केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : तुम्ही जर बँक खात्याचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बँकेच्या काही महत्त्वाच्या नियमात पुढील महिन्यापासून बदल होणार आहेत, असा दावा काही मीडिया अहवालातून केला जात आहे. बँकेकडून आधीपासून एसएमएस सुविधा, मिनिमम बॅलन्स, एटीएम आणि चेकबुकचा वापर इ. सुविधांवर बँकेकडून शुल्क आकारले जाते. मात्र आता यामध्ये आणखी एक सुविधा समाविष्ट होत आहे, असा दावा यातून केला जात आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा फेटाळला आहे.

कोणत्या बँकेसंदर्भात होत आहे दावा?

आता ग्राहकांना पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी देखील काही निश्चित शुल्क द्यावे लागणार आहे. याची सुरुवात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने केली आहे. एवढचं नव्हे तर बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँक याबाबत त्यांचा निर्णय लवकरच घेणार आहेत, असंही यात म्हटलं आहे. यानुसार 1 नोव्हेंबर 2020 पासून निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा हे व्यवहार केल्यावर ग्राहकांना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे, असे म्हटले आहे. तसंच बँक ऑफ बडोदाने चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे तर बचत खात्यातून  पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे शुल्क निर्धारित केले आहे. पुढील महिन्यापासून ग्राहक लोन खात्यासाठी महिन्यातून 3 वेळानंतर जेवढे वेळा पैसे काढतील, तेव्हा त्यांना 150 रुपये द्यावे लागतील.दरम्यान पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यात बनावट नियम

-या दाव्यानुसार, बचत खातेधारकांना तीन वेळा पैसे जमा करणे मोफत असेल. मात्र तर चौथ्या वेळी पैसे भरायचे असतील तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना देखील यामध्ये कोणतीही सवलत नाही आहे. जनधन खातेधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे पण पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील

-दाव्यात असेही म्हटले आहे की, सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधार प्रति दिन एक लाख रुपये जमा करू शकतील. ही सुविधा नि:शुल्क असेल. मात्र याहून अधिक पैसे भरण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. अशा ग्राहकांना एक लाखापेक्षा अधिक रक्कम भरण्यासाठी प्रत्येक एक हजार रुपयांवर एक रुपया चार्ज द्यावा लागेल. याकरता कमीत कमी शुल्क 50 रुपये आणि  जास्तीत जास्त 20 हजार रुपये आहे.

(हे वाचा-नोव्हेंबरमध्ये दिवाळीव्यतिरिक्त या दिवशीही असणार बँका बंद, सुट्टीची यादी तपासून)

- मीडिया अहवालात प्रसिद्ध झालेल्या या दाव्यात असे म्हटले आहे की, जर सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून एका महिन्यात तीन वेळा पैसे काढले तर कोणतेही शुल्क नाही आहे. या खात्यातून चौथ्यांदा पैसे काढण्यासाठी 150 रुपये द्यावे लागतील

बचत खातेधारकांना पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील असा दावा

पीआयबीने हा देखील दावा फेटाळला आहे की, बचत खातेधारकांसाठी तीन वेळा रक्कम जमा करणे नि:शुल्क असेल पण चौथ्यांदा पैसे जमा करण्यासाठी 40 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे पैसे काढण्याबाबत बोलायचे झाले तर तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे. चौथ्यांदा पैसे काढण्यासाठी 100 रुपये शुल्क आहे. जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील असा जो दावा करण्यात आला आहे, तो देखील बनावट असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. बँक ऑफ बडोदाने देखील अशा सूचना दिल्या आहेत की असा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 31, 2020, 4:26 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading