मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Recurring Deposit : RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

Recurring Deposit : RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

Recurring Deposit चे व्याजदर आणि मिळणारे रिटर्न्स हे बऱ्याचअंशी मार्केट स्थितीवर अवलंबून असतात.

Recurring Deposit चे व्याजदर आणि मिळणारे रिटर्न्स हे बऱ्याचअंशी मार्केट स्थितीवर अवलंबून असतात.

Recurring Deposit चे व्याजदर आणि मिळणारे रिटर्न्स हे बऱ्याचअंशी मार्केट स्थितीवर अवलंबून असतात.

मुंबई, 27 नोव्हेंबर : जीवनात येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगावेळी आपल्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध असावेत, या उद्देशानं प्रत्येक जण आपपल्या परीनं बचत (Saving tips) करत असतो. बचतीचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध असले तरी योग्य गुंतवणूक (Investment tips) करून त्यातून जास्तीत जास्त परतावा (Saving Returns) मिळेल, अशाच ठिकाणी पैसे ठेवण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो.  देशात सरकारी, खासगी किंवा सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक किंवा बचतीसाठी सर्वांत सुरक्षित आणि लवचिक पर्याय म्हणून आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) किंवा आरडी (RD) या पर्यायाकडे पाहिलं जातं.

सध्या अनेक बॅंका आरडीसंदर्भात विशेष स्कीम उपलब्ध करून देताना दिसतात. त्यामागे ग्राहकांची गरज आणि मागणी यांचा विचार प्राधान्यानं केलेला असतो. आरडीमध्ये गुंतवणुकीची रक्कम आणि मुदत यासंदर्भात विविध पर्यायही उपलब्ध करून दिले जातात.  या माध्यमातून अल्प (Short term) किंवा दीर्घ मुदतीत (Long term) बचत करता येते. अल्प किंवा दीर्घ मुदतीकरिता म्हणजेच 6 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीकरिता गुंतवणुकीचे पर्याय आरडीच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात. मासिक गुंतवणुकीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा एक ठराविक निधी तयार व्हावा, असा याचा उद्देश असतो. बचत किंवा गुंतवणूक करणाऱ्याच्या वयावर (Age) व्याज दर अवलंबून असतो.

योजनांमध्ये सामान्यतः सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) अशी वर्गवारी केली जाते. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना बॅंका अधिक व्याज  (Interest) देतात.

हे वाचा  - या नागरिकांसाठी सर्वात फायद्याची आहे RD, या प्रकारांमध्ये करता येईल गुंतवणूक

व्याजदराचे प्रकारही वेगवेगळे आणि तुलनेनं स्पर्धात्मक असतात.  व्याजदर आणि मिळणारे रिटर्न्स हे बऱ्याचअंशी मार्केट स्थितीवर अवलंबून असतात. असं असलं तरी या माध्यमातून 5 ते 8 टक्क्यांपर्यंत किंवा अगदी सरासरी 6 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. बँक बाजारवरील माहितीनुसार आरडी खात्याच्या प्रकाराबाबत आणि व्याजदराबाबात सविस्तर जाणून घेऊ या.

ज्युनिअर आरडी योजना (Junior RD Scheme) : आज अनेक बॅंका लहान मुलांकरिता रिकरिंग डिपॉझिट स्कीम उपलब्ध करून देत आहेत. मुलांचं (Children) शिक्षण, तसंच अन्य गरजांच्या अनुषंगाने पालक ठेव ठेवू शकतात किंवा बचत करू शकतात. मुलांना आर्थिक व्यवहारांची ओळख व्हावी या उद्देशानेही या स्कीमचा लाभ घेता येतो. या ठेवीवर मिळणारं व्याज सामान्य आरडी योजनांप्रमाणेच असतं आणि यातून युवकांना बचतीसाठी प्रोत्साहनही मिळतं.

रेग्युलर सेव्हिंग योजना (Regular Saving Scheme) : 18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकासाठी बॅंका रिकरिंग डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध करून देतात. सर्वसामान्यपणे 6 महिने ते 10 वर्षं कालावधीकरिता नागरिक एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवू शकतात. याच्या व्याजाची गणना साध्या किंवा चक्रवाढ पद्धतीने होते. मुदतीनंतर सर्व रक्कम नागरिक काढून घेऊ शकतात किंवा ती एखाद्या योजनेत पुन्हा गुंतवू शकतात. अगदी 10 रुपये प्रतिमहिनाप्रमाणेही रिकरिंग डिपॉझिट सुरू करता येतं. या योजनेत व्याज दर हा 4 ते 6.50 टक्क्यांदरम्यान असतो.

एनआरई/एनआरओ आरडी योजना (NRE/NRO RD Scheme)  : एनआरई, एनआरओ रिकरिंग डिपॉझिट खात्यास कदाचित कमी व्याजदर मिळू शकतो; मात्र या खात्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दर दिला जातो. या माध्यमातून एनआरई, एनआरओ अगदी कमी रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करू शकतात.

हे वाचा  -  रिकरिंग डिपॉझिटच्या (RD) व्याजदरावर परिणाम करणारे हे आहेत महत्त्वपूर्ण घटक

सीनिअर सिटीझन्स आरडी योजना (Senior Citizens RD Scheme) : जवळपास सर्वच बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज देतात. साधारणपणे प्रचलित व्याजाच्या तुलनेत दर वर्षी 0.50 टक्के व्याज अधिक दिलं जातं. या योजनेत व्याज दर हा 4.00 ते 7.25 टक्क्यांपर्यंत असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवानिवृत्तीनंतरचं जीवन आणि वृद्धापकाळाचा विचार करून ही योजना आखलेली असते.

स्पेशल आरडी योजना (Special RD Scheme)  : बॅंका नागरिकांची क्षमता आणि गरजांचा विचार करूनच ही योजना आखतात. तुमचं ध्येयधोरण अगदी स्पष्ट असेल, तर तुम्हाला बॅंका जास्त व्याजही देतात. काही योजना तर ग्राहकांना विम्याची सुविधाही उपलब्ध करून देतात. आयसीआयसीआय बॅंकेची आयविश डिपॉझिट योजना ही अशीच स्पेशल योजना म्हणता येईल.

फ्लेक्सी आरडी योजना (Flexi RD Scheme) : या योजनेत पुरुष किंवा महिला त्यांच्या सोयीनुसार रक्कम गुंतवू शकतात. या योजनेत गुंतवणुकीची एकूण रक्कम ठरलेली असते आणि खातेधारक या रकमेच्या पटीत रक्कम डिपॉझिट करू शकतो.

अशा प्रकारे ग्राहक रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून व्याज मिळवू शकतात आणि या रकमेतून गरजा पूर्ण करू शकतात.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments