OLA ने सुरू केली नवी सेवा, कार भाड्याने घ्या आणि स्वत: चालवत हवं तिथे जा

OLA ने सुरू केली नवी सेवा, कार भाड्याने घ्या आणि स्वत: चालवत हवं तिथे जा

OLA कंपनी 2 तासांपासून ते 3 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी कार भाड्याने देणार आहे. कारचा पिक अप आणि ड्रॉपसाठी रेसिडेन्शियल हब बनवले जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : OLA ने एक नवी सेवा सुरू केली आहे. तुम्हाला कुठे जायचं असेल तर कार बुक करून तर जाता येतंच पण त्याहीपेक्षा कार भाड्याने घेऊन चालवण्याची सुविधाही OLA देणार आहे. ही सेवा पहिल्यांदा बंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली या शहरांतही OLA ची ही सेवा मिळेल. 2020 पर्यंत सुमारे 20 हजार कार या सेवेसाठी उपलब्ध असतील.

3 महिन्यांसाठी भाड्याने घेऊ शकाल कार

OLA कंपनी 2 तासांपासून ते 3 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी कार भाड्याने देईल. कारचा पिक अप आणि ड्रॉपसाठी रेसिडेन्शियल हब बनवले जाणार आहेत. कार भाड्याने घ्यायची असेलक तर OLA अॅपच्या ड्राइव्ह टॅबच्या माध्यमातून कार बुक करावी लागेल.

एवढी होईल बचत

OLA चा दावा आहे की, स्वत: कार चालवली तर ग्राहकांची 30 टक्के बचत होईल. जेवढं अंतर कार चालवणार आहोत त्यासाठी पेमेंट करावं लागेल. OLA कंपनीशी जोडलेल्या गाड्या या योजनेत उपलब्ध असतील. इकॉनॉमी एंड प्रिमियम हॅचबॅक, प्रिमियम सेडान, कॉम्पॅक्ट अँड प्रिमियम SUV, लक्झरी कार या सगळ्या गाड्या भाड्याने घेता येतील.

(हेही वाचा : खूशखबर! दिवाळीच्या दिवसात सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर)

==========================================================================================

VIDEO :आम्हाला कंगवा ठेवायला काही राहिलंच नाही, अजितदादांची तुफान फटकेबाजी

Published by: Arti Kulkarni
First published: October 18, 2019, 7:26 PM IST
Tags: moneyola

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading