नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : या दिवाळीच्या निमित्ताने सोनं खरेदी करणार असाल तर सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात घसरण झालीय. चांदीचेही दर खालावल्याने चांदीची चमक कमी झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत 145 रुपयांची घट झाली. आता सोन्याची किंमत 38 हजार 925 रुपये प्रतितोळा झाली आहे. चांदीच्या किंमतीतही 315 रुपयांनी घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीतली घसरण आणि रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याचे दर खालावले. चांदीची चमक उतरली सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही घसरले. एक किलो चांदीचा दर 46 हजार 325 रुपये रुपये झाला आहे. गुरुवारी चांदीची किंमत 46 हजार 640 रुपये होती. तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या आधी ही चांगलीच सुवर्णसंधी आहे. (हेही वाचा : Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, नोकरीवर टांगती तलवार) ============================================================================ VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीला ओवेसींचा भाजपला सवाल, म्हणाले…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.