मराठी बातम्या /बातम्या /मनी /

New IPO : Nykaa कंपनीचा आयपीओ 'या' दिवशी खुला होणार; जाणून घ्या कंपनीबद्दल सर्वकाही

New IPO : Nykaa कंपनीचा आयपीओ 'या' दिवशी खुला होणार; जाणून घ्या कंपनीबद्दल सर्वकाही

Nykaa हा एक प्रकारचा स्टार्टअप (Startup) आहे जो IPO मार्केटमध्ये  येणार आहे. आतापर्यंत IPO आणणारा हा पहिला युनिकॉर्न आहे जो नफ्यात आहे.

Nykaa हा एक प्रकारचा स्टार्टअप (Startup) आहे जो IPO मार्केटमध्ये येणार आहे. आतापर्यंत IPO आणणारा हा पहिला युनिकॉर्न आहे जो नफ्यात आहे.

Nykaa हा एक प्रकारचा स्टार्टअप (Startup) आहे जो IPO मार्केटमध्ये येणार आहे. आतापर्यंत IPO आणणारा हा पहिला युनिकॉर्न आहे जो नफ्यात आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 22 ऑक्टोबर : गुंतवणुकीसाठी जर तुम्ही एखाद्या नव्या IPO वाट पाहत असाल किंवा तुम्हाला IPO द्वारे पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. युनिकॉर्न कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करुन तुम्ही नफा कमावू शकता. ब्यूटी स्टार्टअप Nykaa चा IPO या महिन्यात 28 ऑक्टोबर रोजी ओपन होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Nykaa चा IPO 28 ऑक्टोबर रोजी ओपन होईल आणि 1 नोव्हेंबरला बंद होईल. या IPO च्या माध्यमातून कंपनी 5,200 कोटी रुपये उभारणार आहे. ऑनलाईन स्टोअर या IPO साठी त्याचे मूल्य 7.4 अब्ज डॉलर ठेवण्याचा विचार करत आहे. Kotak Mahindra Capital, Bofa Securities, Citi, JM Financial, Morgan Stanley आणि ICICI Securities ची या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या आयपीओची तारीख 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या या आयपीओमध्ये 630 कोटी रुपयांचा फ्रेश इशू असेल. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे, प्रमोटर्स आणि भागधारक 41,972,660 शेअर्स विकतील. Nykaa ला आपल्या प्रस्तावित IPO साठी SEBI कडून 14 ऑक्टोबर रोजी मंजुरी मिळाली होती. Radhakishan Damani यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला Nykaa हा एक प्रकारचा स्टार्टअप आहे जो IPO मार्केटमध्ये  येणार आहे. आतापर्यंत IPO आणणारा हा पहिला युनिकॉर्न आहे जो नफ्यात आहे. याशिवाय, ही देशातील एकमेव नवीन पिढीची कंपनी आहे, ज्याचे मूल्यांकन अब्ज डॉलरमध्ये असूनही, त्यात प्रमोटर ग्रुपचा हिस्सा अर्ध्याहून अधिक आहे. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट कंपनीचे देशभरात 68 स्टोअर्स Nykaa ची स्थापना 2012 मध्ये फाल्गुनी नायर या माजी इनवेस्टमेंट बँकरने केली होती. कंपनी सौंदर्य उत्पादने विकते. ऑनलाईन विक्री व्यतिरिक्त, कंपनी किरकोळ दुकानांद्वारे देखील विक्री करते. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये TGP आणि Fidelity सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. Nykaa च्या पोर्टफोलिओमध्ये 15,000 हून अधिक ब्रँडचा समावेश आहे. यात obbi Brown,LOccitane आणि Estee Lauder सारखी मोठी नावे आहेत. कंपनीची देशभरात 68 स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचे उत्पन्न 1,860 कोटी रुपये आहे.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या