मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एका वर्षात गुंतवणुकदारांना केलं लखपती; या शेअरद्वारे चांगल्या कमाईची संधी

एका वर्षात गुंतवणुकदारांना केलं लखपती; या शेअरद्वारे चांगल्या कमाईची संधी

शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करायची असेल तर या न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सचा (Nucleus Software Exports) या शेअरचा जरूर विचार करू शकता.

शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करायची असेल तर या न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सचा (Nucleus Software Exports) या शेअरचा जरूर विचार करू शकता.

शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करायची असेल तर या न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सचा (Nucleus Software Exports) या शेअरचा जरूर विचार करू शकता.

नवी दिल्ली, 30 जून: सध्या शेअर बाजारात तेजीचा कल असल्यानं गुंतवणूकदारांना अनेक शेअर्सनी चांगला फायदा दिला आहे. त्यामुळं सध्या अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करायची असेल तर या शेअरचा जरूर विचार करा. हा शेअर न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सचा (Nucleus Software Exports) आहे .

ही आर्थिक सेवा क्षेत्राला बँकिंग ट्रान्झेक्शन सोल्यूशन्स (Banking Transactions Solutions) पुरवणारी जागतिक पातळीवरील अग्रणी कंपनी आहे. तिचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर (Multibagger) अर्थात लाभदायी असल्याचं सिद्ध झालं आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) यांच्या पोर्टफोलिओमध्येही या शेअरचा समावेश असून, त्यांचा या कंपनीत 1.15 टक्के हिस्सा आहे.

25 टक्के वाढीची शक्यता -

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये इतकी प्रचंड वाढ झालेली असूनही अजून मध्यम कालावधीत त्यात आणखी 25 टक्के वाढ अपेक्षित आहे.

एका वर्षात 273 रुपयांवरून 610 रुपयांवर -

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत 273.55 रुपयांवरुन 610 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच कंपनीनं एका वर्षात गुंतवणूकदारांना 122 टक्के परतावा दिला आहे. सध्या यात प्रॉफीट बुकिंग होत असून गेल्या महिन्यापासून हा थोडासा बाजूला पडल्याचं दिसत आहे.

(वाचा - SIP मध्ये गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं; 5 वर्षात चौपट होतील पैसे, काय आहे योजना?)

काय आहे तज्ज्ञांचं मत -

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, 6 ते 9 महिन्यांच्या मुदतीसाठी 750 रुपयांचं लक्ष्य ठेवून या शेअरची खरेदी करावी. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईवर (NSE) मंगळवारी सकाळी दहा वाजता न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सचा शेअर 3.47 टक्के वाढीसह 609.80 रुपयांवर होता. न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सच्या फंडामेंटल्सबद्दल (Fundamentals) बोलताना आशिका स्टॉक ब्रोकिंग कंपनीचे इक्विटी रिसर्च हेड अरिजित मालाकर म्हणाले, ‘ही एक अग्रगण्य बँकिंग ट्रान्झेक्शन सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी आहे. दिवसाला 2.6 दशलक्ष व्यवहारांची सुविधा पुरवणारी ही कंपनी 200 अब्जहून अधिक रकमेचं कर्ज व्यवस्थापन करते. दररोज 2 लाख युजर्स या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करतात.

अजूनही या शेअरमध्ये वाढ बाकी आहे. त्यामुळे अल्प किमतीत भरघोस फायदा मिळवण्यासाठी हा शेअर खरेदी करणं उत्तम पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळं शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांनी याची निवड करणं फायद्याचं ठरेल.

First published:

Tags: Investment, Money, Share market, Small investment business, Stock Markets