मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2004 मध्ये नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली सुरू करण्यात आली. 2009 मध्ये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही प्रणाली लागू झाली. या योजनेअंतर्गत तुम्ही नियमित गुंतवणूक करू शकता आणि 60 वर्षांचे झाल्यानंतर जमा केलेल्या रकमेचा एक भाग काढून घेऊ शकता. उर्वरित रकमेवर नियमित पेन्शनच्या रुपात उत्पन्न मिळवता येऊ शकतं. एनपीएसमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्समध्येही सूट मिळते. एनपीएसमध्ये टियर-1 आणि टियर-2 अशी दोन प्रकारची खाती उघडता येतात. एनपीएसच्या माध्यमातून टॅक्स सूट मिळवायची असेल तर टियर-1 खात्याचा पर्याय आहे. सेवानिवृत्ती बचतीसाठी टियर-1 आहे. तर टियर-2 हे ऐच्छिक बचत खाते आहे. एनपीएसमध्ये गुंतवणूक आणि पैसे काढणं या दोन्हीवरही टॅक्स सूट मिळते. किती मिळू शकते टॅक्समध्ये सूट एनपीएस टियर-1 खात्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास खातेदाराला आयकर कायदा 80 सी नुसार वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत आणि 80 सीसीडी (1 बी) नुसार वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंत टॅक्स सुटीची सवलत मिळू शकते. एकूणच आपल्या एनपीएस खात्यात 2 लाखांपर्यंत योगदान दिले जाऊ शकते आणि टॅक्स कपातीचा लाभ घेता येऊ शकतो.
Financial Planning: ‘या’ वयापासूनच करा गुंतवणूकीला सुरुवात, चाळीशीच्या आतच व्हाल करोडपतीफिस्डमचे रिसर्च हेड नीरव करकेरा म्हणाले की, पगारदार कर्मचाऱ्यांसाठी गुंतवलेली रक्कम किंवा मूळ वेतनाच्या 10 टक्के आणि डीए म्हणजेच डिअरनेस अलाउन्स ही वजावटीची रक्कम मानली जाते. तर स्वयंरोजगार करणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी गुंतवलेली रक्कम किंवा एकूण उत्पन्नाच्या 20 टक्के यापैकी जे कमी असेल, ती रक्कम कपातीचा दावा करण्यास पात्र मानली जाते. पैसे काढण्यावर टॅक्स सूट एनपीएस टियर-1 खात्यातून काढलेल्या पूर्ण रकमेवर टॅक्समध्ये सूट मिळते. नीरव करकेरा यांच्या मते, एनपीएस टियर-1 खात्यातून विशिष्ट उद्दिष्टांसाठीच 60 वर्षांच्या आधी गुंतवणुकदार पैसे काढू शकतो. एकूण गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी 25 टक्क्यांपर्यंत काढण्यात आलेल्या रकमेवर टॅक्समध्ये सूट मिळते. त्यापेक्षा अधिक सूट दिली जात नाही. दुसरीकडे टियर-2 खात्यातून पैसे काढले जात असतील तर काढण्यात आलेल्या रकमेला टॅक्स पात्र रक्कम मानले जाईल. या उत्पन्नावर तुमच्या स्लॅबनुसार टॅक्स आकारला जाऊ शकतो.
नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांनी कशी करावी बचत? वापरा या सोप्या टिप्सदरम्यान, सेवानिवृत्तीच्या काळात आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी एनपीएस खातं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वत:चं भविष्य सुरक्षित करायचं असेल व पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहाण्याची आवश्यकता वाटत नसेल तर राष्ट्रीय पेन्शन योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीला पत्नीच्या नावावर एनपीएस खाते उघडता येऊ शकते. एनपीएस खाते पत्नीला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम मिळवून देऊ शकते. यासोबत त्यांना दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळते.