मुंबई, 13 ऑक्टोबर: वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचे अधिकार तसेच अनेक विशेषाधिकार उपलब्ध होतात. वयाच्या या टप्प्यावर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. या वयात ड्रायव्हिंग लायसन्स, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसह जीवनाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यास सक्षम होतो. असे असूनही जो निर्णय आधी घ्यायला हवा, तो घेण्यात बहुतांश तरुण चुकतात. जितक्या लवकर तुम्ही इक्विटी-लिंक्ड मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल तितके तुमच्यासाठी चांगले होईल. वास्तविक असं केल्यानं तुम्हाला दीर्घ कालावधीनंतर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे धोरणात्मक भागीदारी प्रमुख- विकास माथूर यांनी 18 व्या वर्षी आर्थिक नियोजनाचे फायदे उदाहरणासह स्पष्ट केले आहेत. ते म्हणतात की तुम्ही आतापासून 3000 म्युच्युअल फंड SIP मध्ये नियमित मासिक आधारावर गुंतवणूक केली तर 30 वर्षांनंतर अंदाजे 12% वार्षिक व्याजदरानं, तुम्ही परतावा म्हणून 1 कोटी 5 लाख रुपये जोडू शकता. जर तुम्ही 5 वर्षांनी तीच गुंतवणूक करायला सुरुवात केली तर 25 वर्षांनंतर त्याच वार्षिक व्याजदराने तुम्हाला सुमारे 56 लाख 37 हजार रुपयांचा परतावा मिळू शकेल. विकास माथूर म्हणतात की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास विलंब होता कामा नये. मात्र, यावरील परतावा बाजार ठरवतो आणि जर आपण 12 टक्के वार्षिक परताव्याच्या दराबद्दल बोललो तर ते इक्विटी योजनांशी संबंधित गेल्या काही आकडेवारीनुसार सांगितले गेले आहे. गुंतवणूक कशी सुरू करावी? तरुण गुंतवणूकदारांनी नेहमी दीर्घकालीन परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. वास्तविक, वयाच्या या टप्प्यावर बाजारातील जोखीम आणि त्यातून सावरण्याची क्षमता जास्त असते. माथूर म्हणतात की इक्विटी मार्केट समजून घेण्यासाठी तुम्ही छोट्या रकमेची गुंतवणूक करून सुरुवात करू शकता. आणि तुम्ही तुमची स्वतःची खास गुंतवणूक प्रोफाइल तयार करू शकता. 5 ते 6 वर्षात तुम्हाला इक्विटी मार्केटचे चांगले आकलन झाल्यानंतर तुम्ही त्यात तुमची अधिक बचत गुंतवू शकता. जर तुम्ही आर्थिक शिक्षणाच्या बाबतीत कमकुवत असाल, तर पैशाच्या सुरक्षिततेबाबत तुमची प्राथमिकता खूप महत्त्वाची आहे. जास्त रिस्क घेणं टाळलं पाहिजे. भांडवली बाजारात गुंतवणूक करणं हा एक महत्त्वाचा पैलू आहे. विकास माथूर इक्विटी मार्केट समजून घेण्यासाठी वयाच्या 18व्या वर्षी किमान 3 वर्षे म्युच्युअल फंड आणि ब्लू चिप समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. तसेच दरवर्षी तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करत रहा. ते म्हणतात की ट्रेडिंग मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, त्याचे तपशील देखील समजून घेतले पाहिजेत. हेही वाचा: Home buying Tips: घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी तपासा, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी? जर तुम्हाला या वयात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडायचा असेल, तर म्युच्युअल फंडातील एसआयपी, स्मॉल तिकिट साइज वेल्थ आणि ब्लू चिप स्टॉक्स तुमच्यासाठी अधिक चांगले असू शकतात. तिघेही 3-5 वर्षात चांगला परतावा देतात. बाजारातील अस्थिरता आणि दीर्घ कालावधीसह वाजवी परतावा देणाऱ्या योजनांपेक्षा या तिन्हींवर चक्रवाढ केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळतो. विकास माथूर म्हणतात की बँकेची आवर्ती ठेव (RDs) योजना लहान गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहे. येथे अशा गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावाही मिळतो. पोर्टफोलिओ डायवर्सिफिकेशन- बाजारातील जोखीम टाळण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा. म्हणजेच तुमची सर्व बचत एकाच योजनेत गुंतवण्याऐवजी ती अनेक योजनांमध्ये टप्प्याटप्प्यानं गुंतवा. जेणेकरून तुमच्या एखाद्या योजनेत चांगला परतावा मिळाला नाही, तर दुसरी योजना तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. असं केल्यानं तुम्ही बाजारातील धोका सहज टाळू शकता. क्रिप्टो चलनात गुंतवणूक करायची की नाही? क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा करा. वयाची 18 वर्षे पूर्ण होताच तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. त्याचा नक्कीच उपयोग करा आणि वयाच्या या टप्प्यापासून येणाऱ्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्यासाठी आर्थिक नियोजन करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.