जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Pension Scheme: निवृत्तीनंतर मिळवा लाखो रुपयाची पेन्शन; किती गुंतवणूक करावी लागेल?

Pension Scheme: निवृत्तीनंतर मिळवा लाखो रुपयाची पेन्शन; किती गुंतवणूक करावी लागेल?

Pension Scheme: निवृत्तीनंतर मिळवा लाखो रुपयाची पेन्शन; किती गुंतवणूक करावी लागेल?

NPS मध्ये निवृत्तीपर्यंत नियमित गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीनंतर तुम्ही जास्तीत जास्त 60 टक्के रक्कम काढू शकता आणि उर्वरित 40 टक्के पेन्शन दिली जाते. शिल्लक रकमेपैकी 40 टक्के रक्कम जीवन विमा कंपनीकडे सुपूर्द केली जाते

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System) ही सरकार सपोर्टेड पेन्शन योजना (Pension Scheme) आहे. त्याचा पैसा इक्विटी आणि डेट या दोन्ही साधनांमध्ये वापरला जातो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna) इत्यादींप्रमाणे, ही एक ऐच्छिक योगदान पेन्शन स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी आणि पेन्शन काढण्याच्या संपूर्ण रकमेवर आयकर सूट दिली जाते. मात्र जर एखाद्या गुंतवणूकदाराने एकरकमी मॅच्युरिटी रक्कम योग्य प्रकारे वापरली तर तो त्याच्या मासिक पेन्शनची रक्कम वाढू शकते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एनपीएस खाते उघडावे लागेल. निवृत्तीपर्यंत (Retirement) नियमित गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीनंतर तुम्ही जास्तीत जास्त 60 टक्के रक्कम काढू शकता आणि उर्वरित 40 टक्के पेन्शन दिली जाते. शिल्लक रकमेपैकी 40 टक्के रक्कम जीवन विमा कंपनीकडे सुपूर्द केली जाते, जिथून तुम्हाला आयुष्यभर पेन्शन किंवा वार्षिकी मिळणे सुरू होईल. नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार? पेन्शनचं कॅलक्युलेशन समजा तुम्ही 30 वर्षांचे असाल तर मॅच्युरिटी वय 60 वर्षांपर्यंत अंदाजे 10 टक्के वाढीने गुंतणूक करणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत वयाच्या 60 व्या वर्षी शून्य टक्के रक्कम काढल्यावर एक लाख रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 9000 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षी 40 टक्के पैसे काढल्यास 1 लाख रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 22,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे, तुमचे वय, बचतीची रक्कम, परतावा दर आणि पैसे काढण्याचा दर यावर अवलंबून, तुम्ही 50,000 रुपये किंवा रुपये 1 लाख किंवा त्याहून अधिक आजीवन पेन्शन मिळवण्याची योजना करू शकता. NPS मध्ये गुंतवणुकीवर कर लाभ देखील उपलब्ध आहेत. 1000 रुपये देऊन खाते उघडता येते » NPS टियर-1 आणि टियर-2 अंतर्गत दोन प्रकारची खाती उघडली जातात. » टियर-1 हे सेवानिवृत्तीचे खाते आहे, तर टियर-2 हे ऐच्छिक खाते आहे, ज्यामध्ये कोणतीही पगारदार व्यक्ती स्वत:च्या वतीने गुंतवणूक सुरू करू शकते. » टियर-1 खाते उघडल्यानंतरच टियर-2 खाते उघडले जाते. » एनपीएस टियर 1 सक्रिय ठेवण्यासाठी वार्षिक योगदान आधीच 6,000 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आले आहे. » तुम्ही ही गुंतवणूक वयाच्या 65 वर्षापर्यंत चालवू शकता. » NPS गुंतवणुकीवर 40 टक्के वार्षिकी खरेदी करणे आवश्यक आहे. » 60 वर्षानंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते. » किमान वार्षिक गुंतवणूक न केल्यास, खाते गोठवले जाते आणि निष्क्रिय केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात