नवी दिल्ली: नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये (NPS) पैसे गुंतवणाऱ्या सबस्क्रायबरच्या मृत्यूनंतर पैसे नॉमिनीला दिले जातात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे (PFRDA) तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार, एनपीएस खात्यात जमा केलेल्या रकमेवर केवळ नॉमिनीचा हक्क असतो. पण, काहीवेळा असंही घडतं की एनपीएस सबस्क्रायबर नॉमिनी निवडत नाही आणि त्याआधीच त्याचा मृत्यू होतो. पीएफआरडीएने आता नॉमिनीशी संबंधित नियम स्पष्ट केले आहेत. 22 ऑक्टोबर 22 रोजी जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये पीएफआरडीएने म्हटलं आहे की नॉमिनी व्यक्तीची निवड फक्त सबस्क्रायबरच करू शकतो. एनपीएसअंतर्गत नियोजित आणि कव्हर करण्यात आलेल्या सदस्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सेवा रेकॉर्डमध्ये केलेल्या नॉमिनीला प्रभावी करण्यासाठी एक्झिट रेग्युलेशनअंतर्गत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. दाव्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या सरकारी आणि बिगर-सरकारी सेक्टर, पीओपी आणि एनपीएसटी संदर्भातील विविध मध्यस्थांना मदत करण्यासाठी आता काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. मृत्यूनंतर नॉमिनी निवडता येणार नाही सर्क्युलरमध्ये असं म्हटलंय की मृत सबस्क्रायबर्सच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून सबस्क्रायबरच्या मृत्यूनंतर नॉमिनी व्यक्तीच्या नावामध्ये करण्यात आलेला कोणताही बदल ग्राह्य धरला जाणार नाही. ज्या प्रकरणांमध्ये नॉमिनी अमान्य घोषित केला गेलाय, त्यामध्ये मृत्यूपूर्वी सबस्क्रायबरने केलेले नॉमिनेशन वैध मानले जाईल आणि दावा प्रक्रिया त्यानुसार पुढे जाईल.
व्यावसायिक LPG सिलिंडरचे दर घसरले, घरगुती गॅसचं काय? पाहा तुमच्या शहरातले दरअवैध नामांकन असलेल्या सरकारी व बिगर-सरकारी क्षेत्रातील अनुक्रमे एक्झिट रेग्युलेशन 3(c) आणि 4(c) मध्ये परिभाषित प्रकरणांसाठी संबंधित मध्यस्थाद्वारे प्रक्रिया केली जाईल आणि निधी सदस्यांच्या कायदेशीर वारसांना दिला जाईल. कंपनीचं रेकॉर्ड महत्त्वाचं रेग्युलेशन 3(c) अंतर्गत समाविष्ट असलेले सार्वजनिक क्षेत्रातील सदस्य आणि नियम 4(c) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कॉर्पोरेट सदस्याचा जर वैध नॉमिनीशिवाय मृत्यू झाला असेल, अशा परिस्थितीत कर्मचार्याचा कोणताही नॉमिनी त्याला नोकरी देणाऱ्या कंपनीच्या म्हणजे नियोक्त्याच्या नोंदींमध्ये आढळल्यास त्याचा विचार केला जाईल.
कार घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आजपासून बदलला नियमएनपीएसचा नॉमिनी म्हणून आणि त्याला सर्व लाभ दिले जातील. सिस्टीम इंटरफेसमध्ये नियोक्त्याने हे घोषित करणं आणि प्रमाणित करणं आवश्यक आहे, की कर्मचाऱ्याच्या सेवा रेकॉर्डमध्ये नॉमिनी व्यक्ती अस्तित्वात आहे आणि त्याला सर्व लाभ दिले जात आहेत. ओएच्या बाबतीतदेखील, कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीमध्ये काही बदल केल्यास ते अवैध मानले जाईल.
अशा रितीने एनपीएस योजनेत नॉमिनीसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी खातेधारकाने त्याचा नॉमिनी घोषित करायला हवा.