जाहिरात
मराठी बातम्या / मनी / व्यावसायिक LPG सिलिंडरचे दर घसरले, घरगुती गॅसचं काय? पाहा तुमच्या शहरातले दर

व्यावसायिक LPG सिलिंडरचे दर घसरले, घरगुती गॅसचं काय? पाहा तुमच्या शहरातले दर

व्यावसायिक LPG सिलिंडरचे दर घसरले, घरगुती गॅसचं काय? पाहा तुमच्या शहरातले दर

6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आज म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त झाला आहे. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात झाली आहे. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 115 रूपयांनी कपात, घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच आहेत. आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली. तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 115 रुपयांची कपात केली.

PM Ujjwala Yojana: घरा-घरात मोफत गॅस सिलिंडरची सुविधा, काय आहे ही योजना

दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर कमी झाले. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 6 जुलैपासून कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर आहेत तेवढेच आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला नाही. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेतात आणि आजही या रिव्ह्यूनंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 19 किलो वजनाच्या सिलेंडरवर ही नवी किंमत लागू होणार आहे, तर 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत स्थिर आहेत.

#कायद्याचंबोला: गॅस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तुमची फसवणूक तर झाली नाही ना? असा शिकवा एजन्सीला धडा
News18लोकमत
News18लोकमत

गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आता नुकत्याच बदललेल्या दरानुसार दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 1744 रुपये झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,696 रुपये, कोलकातामध्ये 1,846 रुपये आणि चेन्नईत 1,893 रुपयांना मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gas , LPG Price
  • First Published :
जाहिरात
जाहिरात