मुंबई, 25 सप्टेंबर: आजच्या काळात आधार हे आपल्या ओळखीचं सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनलं आहे. आधारशिवाय सरकारी योजनांचा तसेच बँकिंग सेवांचा लाभ घेणं कठीण आहे. आधार कार्ड 12 अंकी युनिक क्रमांकासह येतं, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधारशी संबंधित सेवा लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी UIDAI देशातील प्रत्येक भागात आपली केंद्रे उघडत आहे. UIDAI ची ही मोठी योजना- UIDAI ने देशातील 53 प्रमुख शहरांमध्ये एकूण 114 आधार सेवा केंद्रे उघडण्याची योजना तयार केली आहे. देशातील सर्व मेट्रो शहरं, सर्व राज्यांच्या राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही आधार सेवा केंद्रे उघडली जातील. सध्या देशात कार्यरत असलेल्या आधार सेवा केंद्रांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संख्या 88 आहे, जी वाढवण्याची तयारी केली आहे. आधारशी संबंधित कामांसाठी सेवा केंद्रांव्यतिरिक्त, देशभरात 35,000 हून अधिक आधार केंद्रे कार्यरत आहेत, जी बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य आणि सरकारद्वारे चालवली जात आहेत. आधार केंद्रावर करता येतील ही कामं- नवीन आधार कार्ड बनवायचं असो किंवा त्यात कोणतेही बदल करायचे असोत, तुम्ही या आधार सेवा केंद्रांमधून आठवड्याचे सातही दिवस सेवा घेऊ शकता. म्हणजेच आठवडाभर सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरु राहतील. या आधार सेवा केंद्रांमध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात. आधार सेवा केंद्रांद्वारे तुम्ही बायोमेट्रिकशी संबंधित काम सहजपणे करू शकता किंवा आधारमध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करू शकता. हेही वाचा: रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी फोन चार्ज करताना सावधान! एकाच्या बँक खात्यातून 16 लाख उडवले
आधार नोंदणी - मोफत
बायोमेट्रिक अपडेट – 100 रुपये
नाव, पत्ता, जन्मतारीख – 50 रुपये
मुलांचे बायोमेट्रिक - मोफत
तुमची काही तक्रार असल्यास तीसुद्धा दाखल करू शकता.
News18लोकमत
जर तुम्ही एखाद्या आधार केंद्रावर अपडेटसाठी गेलात आणि तेथे निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैशांची मागणी होत असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे संबंधितांकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही तुमची तक्रार uidai.gov.in वर मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून नोंदवू शकता.