मुंबई, 2 डिसेंबर: अनेक टेक कंपन्यांनंतर आता आणखी एक भारतीय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. टेक कंपनी ShareChat ने आपला गेमिंग प्लॅटफॉर्म Jeet11 बंद करण्याची घोषणा केली आहे. हे गेमिंग अॅप बंद झाल्यामुळे त्यांच्या 5 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. अगदी आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर कंपनीच्या म्हणण्यानुसार 100 लोकांना नोकरी गमवावी लागू शकते.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना शेअरचॅटच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, स्टँडर्ड बिझनेस प्रॅक्टिस लक्षात घेता आम्ही आमच्या गेमिंग प्लॅटफॉर्म Jeet11 चा व्यवसाय बंद करणार आहोत. याशिवाय कंपनी आपल्या इतर व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या या निर्णयामुळं 100 लोकांना नोकरी गमवावी लागणार आहे.
जीत11 ची सुरुवात 2020 मध्ये झाली-
देशात अनेक गेमिंग अॅप्स सुरू आहेत. यापैकी जीत 11 हे गेमिंग अॅप प्लॅटफॉर्म देखील आहे. शेअरचॅटनं 2020 पासून याची सुरुवात केली. हे अॅप बंद केल्यानं 100 लोकांना काढता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावरून काढून टाकण्यात येणारे बहुतांश कर्मचारी हे नॉन-टेक्निकल क्षेत्रातील आहेत. कंपनी टेक कर्मचार्यांना शेअरचॅट आणि मोज सारख्या इतर बिझनेस प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करेल.
हेही वाचा: सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक
मोहल्ला टेक ही मूळ कंपनी -
मोहल्ला टेक ही Sharechat आणि Moj सारख्या टेक कंपन्यांची मूळ कंपनी आहे. सध्या या कंपनीत 2200 कर्मचारी काम करतात. शेअरचॅट ही एग्रीगेटर कंपनी आहे. ही कंपनी विविध न्यूज ऑर्गनायझेशनना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. तर Moj हे व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. जो व्हिडिओ टिकटॉक आणि इंस्टाग्राम सारख्या रील्स व्हिडीओ युजर्स पर्यंत पोहोचतात.
ट्विटर, मेटासह अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात-
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक नुकसानाचं कारण देत अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. याचसोबत फेसबुकची मदर कंपनी असलेल्या मेटानंही कर्मचारी कपात केली आहे. भारतामधील बायजूज सारख्या कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. या कंपन्यांसह देशविदेशातील अनेक कंपन्यांनी विविध कारणं पुढे करत कर्मचारी कपात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news