Home /News /money /

कोरोना काळातही पुण्यातील सिल्क साड्यांच्या या स्टार्टअपची भरभराट! महिला उद्योजकाने कशी साधली किमया

कोरोना काळातही पुण्यातील सिल्क साड्यांच्या या स्टार्टअपची भरभराट! महिला उद्योजकाने कशी साधली किमया

कोरोना संसर्गाच्या काळात अनेक क्षेत्रातील व्यवसायांवर परिणाम झालेला असताना पुण्यातील एका महिलेने मात्र या काळातही भरभराट केली आहे.

    पुणे, 22 मार्च : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने (Coronavirus Pandemic) सगळ्या जगाची अर्थव्यवस्था (world Economy) खिळखिळी करून टाकली. ऑनलाईन व्यवसायांना (online Businesses) या काळात प्रोत्साहन मिळालं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (Social Media Apps) माध्यमातून ग्राहकांपर्यंत विविध प्रकारची उत्पादनं पोहोचवणं आणि त्यातून ऑर्डर्स घेऊन घरपोच वस्तू देण्याचा व्यवसाय वाढीला लागला. अनेक उद्योजक या काळात कोणतीही नवी गुंतवणूक करण्यापासून दूर राहत होते, त्याच कठीण काळात पुण्यातील (Pune) एका महिला उद्योजीकेने स्टार्टअप (Start Up) सुरू करण्याचं धाडस दाखवलं आणि ते यशस्वीही करून दाखवलं. कोरोना साथीच्या या संपूर्ण काळातही या उद्योगाने व्यवसायात दरमहा 10 टक्के वाढ नोंदवली. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोना साथीच्या संकटाने हताश झालेल्या अनेक उद्योजकांसमोर याच काळात यशस्वी उद्योग करून दाखवत पुण्याच्या प्रियांका घुले (Priyanka Ghule) यांनी एक प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. प्रियांका घुले यांनी माय सिल्क लव्ह (MySilkLove) या त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात केली ती ऑगस्ट 2020 मध्ये, जेव्हा कोरोना संसर्गाची पहिली लाट सुरू होती. अशा वेळी प्रियांका घुले यांनी महिला ग्राहक वर्गासाठी खास सिल्क साड्या (Silk Sarees) आणि अन्य निवडक उत्पादनं घरपोच देण्याचा हा व्यवसाय सुरू केला. त्यांनी 3000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील साड्यांसह अनेक साड्या उपलब्ध केल्या. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि दर महिन्याला आठ ते 10 टक्क्यांनी वाढ होत गेली. ग्राहक संख्या झपाट्याने वाढत गेली. उत्तम उत्पादनं, जलद आणि विश्वासार्ह सेवा यामुळे वारंवार ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढली. प्रियांका घुले यांच्याकडून वारंवार साडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 22 टक्के आहे. झुनझुनवालांची 'ड्रीम होम' जागा, मुंबईत 70 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधणार टॉवर त्यांच्या या व्यवसायामुळे अनेक हातमाग विणकरांना (Handloom Weavers) या साथीच्या कठीण काळात व्यवसाय मिळाला. लॉकडाउनमुळे दुकाने बंद होती, त्यामुळे विणकरांच्या हाताला काम नव्हते. त्यांना त्यांची उपजीविका चालवणं कठीण झालं होतं. अशा काळात प्रियांका घुले यांच्या या सिल्क साड्या आणि हातमागावरील साड्यांची विक्री करणाऱ्या स्टार्टअपने विणकरांना रोजगार मिळवून दिला. हा व्यवसाय सुरू करण्याकरता घुले यांनी स्वत:च्या वैयक्तिक बचतीतील 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली. विणकरांनी तयार केलेल्या उत्तम उत्पादनांचे फोटो काढून त्याची जाहिरात करणं, ग्राहकांकडून ऑर्डर घेऊन त्याप्रमाणे त्यांना ती उत्पादने पोहोचवणं ही सगळी कामे प्रियांका घुले यांची टीम अगदी उत्तम रीतीने पार पाडते. लवकरच, आता या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घुले यांनी घेतला असून, या पुढे फक्त साड्यांपुरते मर्यादित न राहता कुर्तीज, स्टोल्स आणि इतर डिझायनर कपडे उपलब्ध करण्यात येणार आहे. ' माय सिल्क लव्ह हे महिलांसाठी सर्व प्रकारच्या कपड्यांचे वन-स्टॉप डेस्टिनेशन बनवण्याची योजना आहे. अलीकडेच आम्ही सलवार सूट आणि लेहेंगा हे वस्त्रप्रकार दाखल केले असल्याचं घुले यांनी सांगितलं. केवळ 13,650रुपयांत बना बाबा रामदेव यांचे बिजनेस पार्टनर,24 मार्चपासून मिळेल संधी ग्राहककेंद्री व्यवसायावर भर दिल्यानं नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि वाढ होत गेल्याचं घुले यांनी सांगितलं. लॉकडाउनच्या काळात पाच-सहा दिवसांऐवजी आठ ते 10 दिवसांत माल घरपोच होत असतानाही ग्राहकांनी कुरकुर न करता पाठिंबा दिला, त्यामुळेच या संकटावर मात केली, असंही प्रियांका घुले यांनी आवर्जून नमूद केलं. त्यांच्या जवळपास 75 टक्के ग्राहक महिला असून, बहुतेक खरेदी 25 ते 50 वयोगटातील महिला करतात. सलवार सूटसाठी, 15 ते 40 वर्षे वयोगटातील ग्राहक आहेत. तसंच पुण्याव्यतिरिक्त, दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद इथंही ग्राहक आहेत. 'पूर्वी ग्राहकांना साडी खरेदी करण्यासाठी विश्वासार्ह असं योग्य व्यासपीठ सापडत नव्हतं, ते आमच्या माय सिल्क लव्हमुळे उपलब्ध झालं तसंच कारागिरांचं जीवन बदलून फॅशनची नव्याने व्याख्या करण्याचं आमचं ध्येय होतं, असंही घुले यांनी सांगितलं. आता या स्टार्टअपचा विस्तार करण्यासाठी 1 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आहे, असंही त्या म्हणाल्या. 'आमच्या वेबसाइटवर अधिक ग्राहकांचे आणि विक्रेत्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आम्ही सोर्सिंग धोरणावर काम करत आहोत. लॉकडाउनच्या काळात आम्ही डिझाइन आणि सोर्सिंगवर लक्ष केंद्रित केलं,’असंही प्रियांका घुले यांनी नमूद केलं.
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या