जाहिरात
मराठी बातम्या / मनी / केवळ 13,650 रुपयांत बना बाबा रामदेव यांचे बिजनेस पार्टनर, 24 मार्चपासून मिळेल संधी

केवळ 13,650 रुपयांत बना बाबा रामदेव यांचे बिजनेस पार्टनर, 24 मार्चपासून मिळेल संधी

केवळ 13,650 रुपयांत बना बाबा रामदेव यांचे बिजनेस पार्टनर, 24 मार्चपासून मिळेल संधी

बाबा रामदेव यांनी रुची सोया इंडस्ट्रीजचा (Ruchi Soya) FPO आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफपीओ आणण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीची (SEBI) परवानगी मिळाली होती.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 22 मार्च : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचा पतंजली (Patanjali) नावाचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या माध्यमातून सौंदर्य प्रसाधने आणि खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. मॅगीला पर्यायी विविध प्रकारच्या नूडल्सपासून (Noodels) ते शॅम्पू आणि फेसवॉशपर्यंत (Facewash) अनेक उत्पादनं पतंजली बनवतं. आता बाबा रामदेव यांनी रुची सोया इंडस्ट्रीजचा (Ruchi Soya) FPO आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफपीओ आणण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीची (SEBI) परवानगी मिळाली होती. सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी या संदर्भात माहिती दिली. यावेळी रुची सोया इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम भरत उपस्थित होते. बाबा रामदेव मीडियाला संबोधित करताना म्हणाले, “रुची सोया ही आता केवळ कमॉडिटी कंपनी राहिलेली नाही. तिच्याकडे आता FMCG, फूड बिझनेस आणि न्यूट्रास्युटिकल्ससह इतर व्हर्टिकल आहेत.” दरम्यान, रुची सोयाचा (Ruchi Soya) FPO 24 मार्च 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध होईल. या पब्लिक ऑफरला 28 मार्चपर्यंत सबस्क्राइब करता येईल. SBI कॅपिटल मार्केट्स, अॅक्सिस कॅपिटल आणि ICICI सिक्युरिटीज हे या इश्यूचं व्यवस्थापन करणारे गुंतवणूक बँकर आहेत. या FPO च्या माध्यमातून कंपनी 4,300 कोटी रुपये उभारणार आहे.

    हे वाचा -  137 दिवसांनी पेट्रोल-डिझेल दराचा भडका, इतक्या रुपयांनी महागलं इंधन

    रुची सोयाने FPO साठी प्रतिशेअर 615-650 रुपयांचा प्राईज बँड सेट केला आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितलंय की कंपनीच्या इश्यू कमिटीने FPO साठी प्रतिशेअर 615 रुपये फ्लोअर प्राईस आणि प्रतिशेअर 650 रुपये कॅप किंमत मंजूर केली आहे. तर, स्टॉक फायलिंगमध्ये, कंपनीने म्हटलंय की, FPO साठी कमीतकमी लॉट आकार 21 शेअर्सचा आहे. म्हणजेच FPO चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला किमान 21 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. अशाप्रकारे, तुम्हाला रुची सोया या ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील.

    हे वाचा -  ‘या’ झाडाची लागवड करा अन् घरबसल्या व्हा कोट्याधीश, जाणून घ्या सविस्तर माहिती

    दिवाळखोरीमुळे पतंजलीने विकत घेतली रुची सोया योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे रुची सोया ही कंपनी विकत घेतली होती. बँकांचं 12,146 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याने आयबीसी प्रक्रियेला सामोरे गेलेल्या रूची सोया इंडस्ट्रीजवर पतंजली आयुर्वेदने 4,350 कोटी रुपयांच्या बदल्यात ताबा मिळवला होता. रुची सोया या दिवाळखोर कंपनीचा जवळपास 99 टक्के भागभांडवली हिस्सा एवढी रक्कम मोजल्यानंतर पतंजलीकडे आला. आताच्या घडीला रुची सोयामध्ये पतंजली आयुर्वेदची गुंतवणूक ही फक्त एक हजार कोटी रुपयांची असून उर्वरित 3,350 कोटी रुपये त्यांनी बँकांकडून कर्जरूपात उभे केले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात