Home /News /money /

Petrol Diesel Prices : क्रूड ऑइल दरात पुन्हा वाढ, तपासा तुमच्या शहरातील आजचा रेट

Petrol Diesel Prices : क्रूड ऑइल दरात पुन्हा वाढ, तपासा तुमच्या शहरातील आजचा रेट

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी नवे रेट जारी केले. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे.

  नवी दिल्ली, 27 मे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूडचा भाव 118 डॉलर प्रति बॅलरजवळ पोहोचला. परंतु पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी नवे रेट जारी केले. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे. जाणकारांनी या आधी जर जर कच्च्या तेलाचा भाव 110 डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढू शकतो असं म्हटलं होतं. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

  हे वाचा - पेट्रोल-डिझेलनंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

  SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

  पुढील बातम्या