मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता मोटू-पतलू बनवणार सर्वांना टॅक्स एक्स्पर्ट, गेम खेळत शिका कर रचनेतील बारकावे

आता मोटू-पतलू बनवणार सर्वांना टॅक्स एक्स्पर्ट, गेम खेळत शिका कर रचनेतील बारकावे

आता मोटू-पतलू बनवणार सर्वांना टॅक्स एक्स्पर्ट

आता मोटू-पतलू बनवणार सर्वांना टॅक्स एक्स्पर्ट

प्रसिद्ध कार्टून पात्र मोटू आणि पतलू आता तुम्हाला कॉमिक बुकमध्ये टॅक्सचे बारकावे समजावून सांगणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 28 सप्टेंबर : अनेकांना टॅक्स हा डोक्याबाहेरचा विषय वाटतो. त्यातील बारकावे समजत नाही. परिणामी मोठा वर्ग यापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. तुम्हालाही कराचे बारकावे कळत नाही? स्वतः आयकर रिटर्न भरताना त्रास होतो? किंवा नवीन कर बदल तुम्हाला त्रासदायक वाटतात? पण, आता टेन्शन घेण्याचे दिवस गेले आहेत, कारण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत टॅक्स एक्सपर्ट बनवण्यासाठी सरकारने खास कॉमिक बुक आणि गेम लाँच केला आहे. मोटू पतलू हे प्रसिद्ध व्यंगचित्र पात्र आता नवीन पिढीला कर तज्ज्ञ बनणार आहे.

कॉमिक बुकमध्ये असणार मोटू-पतलू

आयकर विभाग आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 'मोटू पतलू कार्टून' या कार्टून कॅरेक्टरद्वारे लोकांना कराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हे डिजिटल कॉमिक बुक तयार केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी त्याचे उद्घाटन केले. त्याच्याशी संबंधित बोर्ड गेमही सुरू केला. सरकारने या मोहिमेला #TaxLiteracyKhelKhelMein असे नाव दिले आहे. प्राप्तिकर विभागाने हे कॉमिक्स 5 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन दिलं आहे. ज्याद्वारे मोटू पतलू भारताच्या कर प्रणालीतील बारकावे लोकांना समजावून सांगतील. जेणेकरून करदात्याला त्याचे योग्य काम करता येईल आणि कर योग्यवेळी सहज जमा करता येईल.

वाचा - सातत्याने घसरण सुरू असताना मार्केटमध्ये रिटायरमेंट फंड कसा तयार करायचा?

साप-शिडीच्या खेळातून समजणार प्राप्तिकर विभाग

सरकारला तरुणांमध्ये टॅक्स संदर्भात जागृती वाढवायची आहे. त्यामुळे कॉमिक बुकसोबतच बोर्ड गेमही सुरू करण्यात आला आहे. हा बोर्ड गेम 'लर्न बाय प्ले' या थीमवर आधारित आहे. याशिवाय कराशी संबंधित थ्रीडी कोडीही तयार करण्यात आली असून, आर्थिक व्यवहाराशी संबंधित चांगल्या-वाईट गोष्टी सांगण्यासाठी साप-शिडीचा खेळही विभागाने तयार केला आहे. सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्या मते, यामुळे नवीन पिढीमध्ये भारतीय कर प्रणालीबद्दल जागरूकता वाढेल आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची भावनाही वाढेल.

'आईन-ए-अकबरी'चे हस्तलिखित 'हेरिटेज'मध्ये असेल

यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत साजरा करण्यात येत असलेल्या आयकॉनिक वीक उत्सवाचीही सांगता झाली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय सीमाशुल्क संग्रहालय आणि जीएसटी देशाला समर्पित केले. या संग्रहालयाला हेरिटेज असे नाव देण्यात आले आहे. हे लोकांना सीमाशुल्क विभागाच्या कार्यपद्धती समजावून सांगेल. 'आईन-ए-अकबरी'चे हस्तलिखित या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. यासोबतच अनेक अनोख्या कलाकृतीही येथे जतन करण्यात आल्या आहेत.

First published:

Tags: Income tax, Tax