नवी दिल्ली - जगभरातील शेअर बाजारांत सध्या घसरण पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि मंदीची भीती यातून यंदा बाजारपेठा सावरू शकलेल्या नाहीत. भारतीय शेअर बाजाराने पुन्हा इतर बाजारांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे, परंतु काही बाजारात थोडी तेजी आल्यानंतर पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत,एखाद्याला त्याच्या रिटायरमेंटसाठी गुंतवणूक सुरू करायची असली तरी, आपले पैसे कुठे सुरक्षित असतील हे त्या व्यक्तीला समजत नाहीये. जेव्हा मनी मार्केटमध्ये सगळीकडे अनागोंदी माजलेली असते, तेव्हा गुंतवणुकदारांनी 3 प्रमुख गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक सुरू करायला हवी. यामुळे त्यांचे पैसे वाढण्याची आणि सुरक्षित राहण्याची शक्यतादेखील वाढेल. ‘द मिंट’ मधील एका लेखाच्या हवाल्याने आम्ही तुम्हाला या तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. खर्च करण्यापेक्षा बचत जास्त करा पीजीआयएम इंडिया पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे पोर्टफोलिओ मॅनेजर सुरजितसिंग अरोरा म्हणतात की, सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता हे वर्ष खूप आव्हानात्मक आहे. पण भारतीय शेअरची स्थिती पुढील 3-5 वर्षांत चांगली दिसते, कारण भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. सध्याच्या परिस्थितीत आपण जेवढे खर्च करतो त्यापेक्षा जास्त बचत करणं गरजेचं आहे. हा एकमेव मार्ग आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे साठवू शकता. शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा कंपाउंडिंग ही एक अद्भुत गोष्ट आहे. ही गोष्ट ज्यांना समजते ते लोक खूप पैसे कमवतात. तुम्ही 100 - तुमचं वय = % या नियमानुसार शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी. सोप्या शब्दांत, जर तुमचं वय 30 वर्षे असेल तर तुमची (100-30) 70 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये असावी. तुम्ही शेअर मार्केटमध्ये किमान 10 वर्षे गुंतवणूक करावी जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा घेता येईल. रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग तज्ज्ञांच्या मते, तुम्ही ज्या वर्षी रिटायर होत असाल, त्या वर्षाच्या खर्चापेक्षा 30 पट जास्त तुमचा रिटायरमेंट फंड असायला हवा. समजा, आजपासून 30 वर्षांनंतर तुमचा वार्षिक खर्च आजच्या 3 लाख रुपयांवरून 12 लाख रुपयांपर्यंत वाढला, तर तुमच्याकडे 30 पट अधिक म्हणजे 3.6 कोटी रुपयांचा रिटायरमेंट फंड असायला हवा. तुम्ही तुमच्या खर्चाचं गणित काढण्यासाठी आणि मोजमाप करण्यासाठी 72 चा नियम वापरू शकता. अशा रितीने तुम्ही गुंतवणूक करायला हवी, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.