जाहिरात
मराठी बातम्या / मनी / हो आहे मी Risk Taker! तसं म्हटलं जाण्याचा आनंद आहे : निर्मला सीतारामन

हो आहे मी Risk Taker! तसं म्हटलं जाण्याचा आनंद आहे : निर्मला सीतारामन

हो आहे मी Risk Taker! तसं म्हटलं जाण्याचा आनंद आहे : निर्मला सीतारामन

Budget 2022 नंतर Network18चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी सीतारामन यांची Exclusive मुलाखत घेतली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: ‘बजेटमध्ये (Budget 2022) मी जोखीम घेतली आहे किंवा मी जोखीम घेणारी (Risk Taker FM) आहे असं म्हटलं जातं, हे जाणून मला आनंद झाला. भारतीय अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडावी यासाठी मी प्रयत्न करत आहे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर माझा भर आहे,’ असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिलं. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचं बजेट सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केलं. त्यानंतर आज (2 फेब्रुवारी) नेटवर्क 18चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी सीतारामन यांची Exclusive मुलाखत घेतली. त्या वेळी कालच्या बजेटच्या पार्श्वभूमीवर त्यांना जोखीम घेणाऱ्या अर्थमंत्री (Risk Taker Finance Minister) असं संबोधण्यात आलं. त्याविषयी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी सरकारच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या (5 Trillion Economy) उद्दिष्टापासून ते एलआयसीच्या आगामी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरपर्यंतच्या (LIC IPO) अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली. सर्व प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलास उत्तरं दिली. सरकारच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोरोना साथीच्या संकटावर मात करून आगेकूच करील आणि आपलं 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचं स्वप्न ठरवलेल्या वेळेतच पूर्ण होईल, अशी खात्री वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. Exclusive | अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या दृष्टीनेच खर्चाचं नियोजन: सीतारामन ‘सगळं जग महागाईमुळे चिंतेत आहे. याचा परिणाम प्रत्येक देशाच्या नियोजनावर झाला आहे. आपल्या देशातल्या महागाईबाबत आम्ही जागरूक आहोत. जीवनावश्यक वस्तू, डाळी आणि खाद्यतेल यासाठी आपण अजूनही आयातीवर अवलंबून आहेत. डाळी आणि तेलबियांचं पुरेसं उत्पादन होत नाही. त्यामुळे ते वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. त्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी उपायोजना राबवल्या जात आहेत,’ असं सीतारामन यांनी सांगितलं. ‘निर्यात वाढत आहे. यात खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी संधी आहे. तसंच खासगी उद्योग क्षेत्राला निर्यातीची संधी मिळावी यासाठी सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. देशात थेट परदेशी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात येत आहे. परदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांशी भागीदारी करण्यासाठी उत्सुक आहेत. पीएलआय योजनेतूनदेखील हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास या सर्व बाबी अनुकूल ठरणार आहेत,’ असं त्या म्हणाल्या. डिजिटल चलन कधी येणार बाजारात? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं उत्तर ‘एअर इंडियातली निर्गुंतवणूक (Air India Disinvestment) हा जटिल विषय होता; मात्र सरकारनं योग्य निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात निधी उभा केला आहे. एलआयसीमधली निर्गुंतवणूक हीदेखील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं पाठबळ देणारी बाब आहे. याशिवाय डिजिटल करन्सी आणण्याचा निर्णयदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत पुराणमतवादी दृष्टिकोन चुकीचा आहे यावर माझा विश्वास नाही. पुराणमतवादी असणं चुकीचं नाही,’ असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात