मुंबई, 21 सप्टेंबर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GST काउन्सिलच्या बैठकीत मोठे निर्णय घेतले. कराचं ओझं कमी झालं. काही गोष्टींवरचा कर वाढलाय. म्हणजे आता 1 ऑक्टोबरपासून काही वस्तू स्वस्त होणार तर काही महाग होणार. काय झालं स्वस्त? 1. हाॅटेलमध्ये राहणं झालं स्वस्त - आता हाॅटेलमध्ये 1000 रुपयांपर्यंतच्या रुमला टॅक्स नाही. 7500 रुपयापर्यंतच्या रुमला आता फक्त 12 टक्के जीएसटी द्यावं लागेल. सरकारच्या या स्कीममध्ये 200 रुपये गुंतवून मिळवा 35 लाख रुपये अशा प्रकारे 7500 रुपयांहून जास्त दर असलेल्या रुमसाठी जीएसटी 18 टक्के आहे. याआधी हाॅटेल रुमसाठी हा GST 28 टक्के होता. जीएसटीचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. 2. स्वस्त झाली वाहनं - जीएसटी काउन्सिलनं 28 टक्के जीएसटीमध्ये येणारी 10 ते 13 सीट्सचे पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवरचा सेस कमी केलाय. पेट्रोल आणि डिझेल झालं पुन्हा महाग, ‘हे’ आहेत आजचे दर 1200 सीसीच्या पेट्रोल वाहनांवरच्या सेसचा दर 1 टक्के आणि 1500 सीसीच्या डिझेल वाहनांवर 3 टक्के कर दिला गेलाय. दोन्ही प्रकारच्या वाहनांवर सेस 15 टक्के आहे. तर जीएसटीवर 28 टक्के आहे. 3. सुकी मिरची झाली स्वस्त - सुक्या मिरच्यांवरचा GST शून्य झालाय. याआधी तो 5 टक्के होता. 4. पँटची झिप झाली स्वस्त - काउन्सिलनं स्लाइड फास्टनर्सवर जीएसटी 18 हून 12 टक्के केलाय. 5. या वस्तू झाल्या स्वस्त - समुद्र नौकेला लागणारं इंधन, ग्राइंडर, हिरा, रुबी, पन्ना किंवा नीलम सोडून इतर रत्नांवरचा कर कमी केलाय. 6. भारताबाहेर तयार होणाऱ्या काही संरक्षण उत्पादनांवरचा जीएसटी कमी केलाय. या गोष्टी झाल्या महाग ट्रेनचे डबे झाले महाग- यावरचा 5 टक्के असलेला जीएसटी 12 टक्के झालाय. कॅफिनवाले पदार्थ झाले महाग - त्यावर 18 टक्क्यांऐवजी 28 टक्के जीएसटी लावलाय. रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी करा अर्ज अर्थमंत्री म्हणाल्या- कॉर्पोरेट टॅक्समधील कपात नव्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांसाठी देखील लागू होणार आहे. जर कंपनीने अन्य कोणतीही सवलत घेतली नसेल तर त्यांना केवळ 22 टक्के टॅक्स द्यावा लागेल. सरचार्जसह एकूण टॅक्स 22.17 टक्के इतका असेल. ही तरतूद 2019-20 या आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहे. > ऑक्टोबर 2019 नंतर नोंदणी झालेल्या कंपन्यांना 15 टक्के कर द्यावा लागले. सरचार्जसह हा टॅक्स 17.01 टक्के असेल. > कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यामुळे सरकारला 1.45 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.