मुंबई, 20 सप्टेंबर : बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँकेत 199 जागा भरायच्या आहेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM या पदांसाठी जागा भरायच्या आहेत. पदं आणि पदसंख्या ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल - 156 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR - 20 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM - 23 सोनं-चांदी झालं स्वस्त, ‘हे’ आहेत शुक्रवारचे दर शैक्षणिक पात्रता ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल यासाठी 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण हवेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR यासाठी अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा तत्सम. जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM यासाठी IIT-खडगपूरमधून सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)/IIT-मुंबईमधून अप्लाइड सांख्यिकी आणि इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा IIT कोलकाता, IIT खडगपूर आणि IIM कलकत्ता 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा तत्सम. ‘या’ व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई आरक्षितांसाठी 50 टक्के हवेत. वयाची अट - 1 सप्टेंबर 2019 रोजी वय 25 ते 30 वर्षापर्यंतच हवं. SC आणि ST ला 5 वर्ष सवलत आहे, तर OBC साठी 3 वर्ष सवलत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ इथे क्लिक करा. अर्जाची फी सर्वसामान्यांसाठी 850 रुपये आणि आरक्षितांसाठी 100 रुपये आहे. VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, ‘मनसेसैनिक सज्ज आहे’, पण…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.