मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फरार नीरव मोदीच्या भावावर अमेरिकेत गुन्हा दाखल, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

फरार नीरव मोदीच्या भावावर अमेरिकेत गुन्हा दाखल, कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप

पीएनबी घोटाळ्यातील (PNB Fraud) आरोपी ज्वेलर आणि सीबीआयच्या केसमध्ये 'वाँटेड' नीरव मोदीचा (Neerav Modi) भाऊ नेहल मोदी (Nehal Modi) याच्यावर अमेरिकेत हिऱ्यामध्ये कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
न्यूयॉर्क, 20 डिसेंबर: पीएनबी घोटाळ्यातील (PNB Fraud) आरोपी ज्वेलर आणि सीबीआयच्या केसमध्ये 'वाँटेड' नीरव मोदीचा (Neerav Modi) भाऊ नेहल मोदी (Nehal Modi) याच्यावर अमेरिकेत हिऱ्यामध्ये कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात नेहल मोदीवर देखील आरोप आहेत. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये हा घोटाळ्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. नेहल मोदीवर जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या हिरे कंपनीमध्ये 2.6 मिलियन डॉलर (19 कोटींपेक्षा जास्त) इतका मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी सीवाय वेंस ज्युनिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार नेहल मोदीवर 'फर्स्ट डिग्रीमध्ये मोठी चोरी' करण्याचा आरोप करण्यात आला आहे. मॅनहॅटनमधील एका हिरे होलसेल कंपनीमधून 2.6 मिलियन डॉलरपेक्षा अधिक किंमतीचे हिरे घेतल्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये हा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात याबाबत नेहलला कोर्टकचेरीचा सामना करावा लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील घोटाळ्याची सुरुवात 2015 मध्ये झाल्याचं मीडिया अहवालात म्हटलं आहे. (हे वाचा-PPF मध्ये गुंतवणूक केल्यास कसा होईल नफा? जाणून घ्या 4 महत्त्वाचे फायदे) Manhattan District Attorney यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, नेहल मोदीने  2015 मध्ये एलएलडी डायमंड यूएसए कडून 2.6 मिलियन डॉलर्स किंमतीचे हिरे मिळवण्यासाठी खोटे रिप्रेझेंटेशन केले आणि त्यानंतर स्वत:साठी त्या हिऱ्यांचे लिक्विडेशन केलं. त्याने फेव्हरेबर क्रेडिट टर्म्समध्ये हे हिरे घेतले होते. प्रॉसिक्यूशनच्या मते मार्च 2015 मध्ये नेहल मोदीने 8,00,000 डॉलर्स किंमतीचे हिरे मागितले आणि ते कोस्टको होलसेल कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीला विक्रीसाठी दाखवल्याचा दावा केला. (हे वाचा-SBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी! 30 डिसेंबरला होणार लिलाव, वाचा सविस्तर माहिती) NDTV च्या अहवालानुसार, नेहल मोदी हा बेल्जियममध्ये राहत असून तो नीरव मोदी याचा भाऊ आहे. फरार नीरव मोदी हिरेव्यापारी असून तो पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर PNB मध्ये 2 बिलियन डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आहोप आहे. सीबीआय देखील नेहल मोदीच्या शोधात आहे.  पीएनबी घोटाळ्यातील दुबईमधील पुरावे नष्ट केल्याचा आरोप नेहल मोदीवर आहे.
First published:

Tags: Pnb bank

पुढील बातम्या