नवी दिल्ली, 31 डिसेंबर : New Year Jio Plan : नवा वर्ष नवा संकल्प आणि नवी सुरुवात घेऊन येणारा असतो. त्याच प्रमाणे वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसोबत स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या Jioनं आपल्या ग्राहकांसाठी देखील एक नव्या वर्षात खास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स jio पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात एक सेवा सुरू करत आहे.
रिलायन्स Jio ने 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विमामूल्य केली आहे. ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओने IUC पूर्णपणे बंद केला असून आता 1 जानेवारीपासून विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे.
IUC काय आहे?
IUC म्हणजे interconnect usage charges म्हणजेच जिओ ते इतर नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी आकारण्यात आलेले पैसे होय. आधी जिओ यासाठी 14 पैसे आकारत होता तर नंतर 7 पैसे आकारले जात होते. आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही मोठी बातमी दिली आहे.
हे वाचा-EPFO खातेधारकांना मिळणार सरकारचं गिफ्ट!6 कोटी लोकांच्या खात्यात येतील PF चे पैसे
रिलायन्स जिओने गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की पूर्णपणे जिओ ते जिओ याशिवाय इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनाशुल्क करता येणार आहेत. IUC शुल्क संपल्यानंतर जिओ ते जिओ आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट (डोमेस्टिक वॉइस) कॉल मोफत करता येणार आहेत. 1 जानेवारी 2021 पासून सर्व कॉल पुन्हा विनामूल्य केले जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Reliance jio postpaid, Relince jio