आयकरबद्दल जाणून घेण्यासाठी वापरा ही वेबसाईट; Income Tax ने सुरु केलं नवं पोर्टल

आधुनिक प्रकारची इन्कम टॅक्स फायलिंग यंत्रणा (E-filing System) विकसित करण्याचं कंत्राट 2019मध्ये इन्फोसिस कंपनीला देण्यात आलं होतं.

आधुनिक प्रकारची इन्कम टॅक्स फायलिंग यंत्रणा (E-filing System) विकसित करण्याचं कंत्राट 2019मध्ये इन्फोसिस कंपनीला देण्यात आलं होतं.

  • Share this:
    मुंबई 22 जुलै: इन्कम टॅक्स विभागाने अलीकडेच नवं पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल वापरणाऱ्यांना सुरुवातीपासूनच अनेक करदात्यांना (Taxpayers) अडचणी येत आहेत. नवं इन्कम टॅक्स पोर्टल (New Income Tax Portal) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरळीतपणे काम करू शकेल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्रालयाने व्यक्त केली आहे. सीएनबीसी टीव्ही 18ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या इन्कम टॅक्स पोर्टलच्या तांत्रिक अडचणी (Technical Problems) लवकरच सोडवल्या जातील. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हे पोर्टल सुरळीतपणे काम करू शकेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. अर्थ मंत्रालय (Finance Ministry) आणि इन्फोसिस ही सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी (Software Service Company) यांच्याद्वारे या पोर्टलबद्दलचे अपडेट्स दररोज घेतले जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. आधुनिक प्रकारची इन्कम टॅक्स फायलिंग यंत्रणा (E-filing System) विकसित करण्याचं कंत्राट 2019मध्ये इन्फोसिस कंपनीला देण्यात आलं होतं. रिटर्न (Income Tax Return) पडताळणीला लागणारा कालावधी 63 दिवसांवरून घटवून एका दिवसावर आणणं आणि रिफंडची (Refund Process) प्रक्रिया गतिमान करणं हा त्यामागचा उद्देश होता. बेपत्ता कुत्रा गॅरेजच्या भिंतीत कसा पोहोचला? अग्निशमन दलानं केली सुटका www.incometax.gov.in हे इन्कम टॅक्सचं नवं पोर्टल सात जून 2021 रोजी मोठा गाजावाजा करत सुरू झालं; मात्र अगदी पहिल्या दिवसापासूनच या पोर्टलच्या वापरात अडचणी येत आहेत. ही वेबसाइट इन्फोसिसनेच विकसित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 22 जून रोजी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली होती. नवं इन्कम टॅक्स पोर्टल वापरताना अनेक अडचणी येत असल्याचं केंद्र सरकारनेही (Central Government) संसदेत मान्य केलं आहे. आतापर्यंत नव्या इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलबद्दल 7000 ई-मेल्स मिळाले असून, त्यापैकी 2000हून अधिक तक्रारी असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. या नव्या ई-फायलिंग वेबसाइटवर युझर्सना 90 हून अधिक प्रकारच्या समस्या येत आहेत. रशियात आलं डासांचं वादळ; Video पाहून तुमचाही उडेल थरकाप ही नवी ई-फायलिंग वेबसाइट विकसित करणाऱ्या इन्फोसिस (Infosys) या कंपनीला वेबसाइट वापरताना येणाऱ्या अडचणींबद्दल सांगण्यात आलं आहे, असं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून स्पष्ट केलं. या नव्या वेबसाइटच्या समस्या दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत, असं इन्फोसिसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ही वेबसाइट सुरळीतपणे चालेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    First published: