Union Budget 2019 : विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक

Union Budget 2019 : विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक

Union Budget 2019 : विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जुलै : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यावर मोदी सरकार आता भर देताना दिसत आहे. याची प्रचिती अर्थसंकल्पामध्ये दिसत असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. आपल्या भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी पुढील पाच वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.त्यामुळे मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचं लक्ष आहे.

सर्वांना मिळणार हक्काचं घर

दरम्यान, सरकारी कंपन्यांच्या जमिनींवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. सर्वानं हक्काचं घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं यापूर्वीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता सरकारी कंपन्यांच्या जमिनीवर परडवणाऱ्या घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2021 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शिवाय, या घरांमध्ये गॅस, विज आमि टॉयलेटची व्यवस्था असणार अशी घोषणा देखील निर्मला सीतारामन यांनी केली. यावेळी निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था वेगानं वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. तर, 114 दिवसांत आता एक घरं बांधलं जात असल्याची माहिती यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली. यापूर्वी देखील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पहिलं घर घेणाऱ्यांसाठी 2.67 लाखांची सबसिडी सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे.

RSS प्रकरणात जामीनानंतर राहुल गांधी म्हणाले, 'मजा आ रहा है'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading