मोदी सरकारची नवी योजना, स्वयंपाकाच्या तेलापासून 'अशी' चालेल तुमची कार

मोदी सरकारची नवी योजना, स्वयंपाकाच्या तेलापासून 'अशी' चालेल तुमची कार

Biodiesel, Modi Government - मोदी सरकारनं स्वयंपाकाच्या तेलापासून बायोडिझेल बनवण्याची योजना आणलीय

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : मोदी सरकारनं स्वयंपाकाच्या तेलाबद्दल एक मोठा निर्णय घेतलाय. या तेलापासून आता बायोडिझेल (Bio Diesel)  बनवलं जाईल. खाण्याचं तेल एकदा वापरल्यानंतर पुन्हा उरलेलं तेल वापरणं शरीराला हानिकारक आहे. म्हणून आता सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL, IOC या स्वयंपाकाच्या तेलापासून बनलेलं बायोडिझेल खरेदी करतील. याची सुरुवात 10 ऑगस्टपासून झालीय.

आज जागतिक जैविक इंधन दिवस आहे. वापरलेलं कुकिंग ऑइल पुन्हा वापरलं तर ब्लड प्रेशर, अल्झायमर आणि लीव्हरशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.

मुकेश अंबानींची मोठी घोषणा, HD टीव्ही मिळणार मोफत

सरकारनं सुरू केली नवी योजना

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची सुरुवात केलीय. स्वयंपाकाचं तेल जमा करण्यासाठी मोबाइल अॅप लाँच केलंय.

जिओ फायबरची सुविधा मिळणार 5 सप्टेंबरपासून, देशभरात करू शकणार मोफत फोन

हाॅटेल आणि रेस्टाॅरंट स्टिकर लावतील. त्यात लिहिलं असेल की बायोडिझेल बनवण्यासाठी आम्ही स्वयंपाकाच्या तेलाचा पुरवठा करतो.

सरकारी तेल कंपन्या या तेलापासून बायोडिझेल बनवण्यासाठी लागणाऱ्या प्लँटबद्दल इच्छुक खासगी कंपन्यांशी बातचीत करतील. त्यानंतर  कंपनी बायोडिझेल 51 रुपये प्रति लीटर दरानं खरेदी करेल. दुसऱ्या वर्षी ते 52.7 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 54.5 रुपये प्रति लीटर केलं जाईल.

दरम्यान,मोदी सरकार वीज वाचवण्यासाठी अनेक योजना सुरू करतंय. त्यातलीच एक म्हणजे केंद्र सरकारची सोलर पाॅलिसी. सूर्याची उर्जा वापरून वीजनिर्मिती करण्याचा हा प्लॅन आहे. आता गुजरात सरकारनं नवं सौर धोरण तयार केलंय. हळूहळू देशभर हे सौर धोरण राबवलं जाईल.

मुकेश अंबानी यांनी केली जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा

सौर धोरणाअंतर्गत गुजरातमध्ये 2 वर्षात 2 लाख घरांमध्ये सौर पॅनल लावण्याची योजना आहे. हे पॅनल लावण्यासाठी स्वस्त दरात बँकेचं कर्ज मिळणार आहे. सौरउर्जेतून मिळणाऱ्या विजेचा उपयोग घरमालक करू शकेल. जे कोणी हे पॅनल लावतील ते स्वस्त दरात वीज विकू शकतील.

व्याजावर सबसिडी आणि वीज खरेदीच्या किमतीची घोषणा लवकरच होईल. त्यासाठी सरकारला आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि वीज स्टोअरेजसाठी ग्रिड तयार करावं लागेल. त्या ग्रिडची किंमत ठरवावी लागेल. घरमालक ते ग्रिड खरेदी करून त्यावर सौरउर्जेची निर्मिती करेल.

गुजरातनंतर महाराष्ट्रात हे होणार आहे. पूर्ण देशभरात प्रत्येक राज्या सौरउर्जेतून वीजनिर्मिती हा प्रकल्प चालवला जाईल. त्याचा फायदा असा की ज्या घरात सौर पॅनल लावलंय, तिथे ही वीज वापरता येईलच. पण अतिरिक्त वीज विकून पैसेही मिळवता येतील. म्हणजेच घरबसल्या चांगला व्यवसाय होईल.

VIDEO : महापूर ओसरल्यानंतरचं भीषण दृष्य, पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांना जलसमाधी

Published by: Sonali Deshpande
First published: August 12, 2019, 3:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading