मुकेश अंबानी यांनी केली जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा

मुकेश अंबानी यांनी केली जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा

Jio Set Top Box, Mukesh Ambani - मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा केली

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या 42व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की जिओचे 34 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झालीय. भारताच्या अर्थव्यवस्थेत रिलायन्सचं महत्त्वाचं योगदान आहे. 2019च्या आर्थिक वर्षात आरआयएल सर्वात नफा देणारी कंपनी ठरलीय. मुकेश अंबानी म्हणाले या वर्षात कंपनीला जास्त फायदा झालाय. मुकेश अंबानी यांनी GigaFiber सुरू करण्याची घोषणा केली. हे सेट टाॅप बाॅक्स मोफत मिळणार आहेत. ग्राहकांना 4 ते टेलिव्हिजनसह हे सेट बाॅक्स मोफत मिळतील.

जिओ फायबरसाठी 15 मिलियन नोंदणी झालीय. ते म्हणाले, आम्ही होम ब्राॅडबँड सर्विस, एन्टरप्राइजेस ब्राॅडब्रँड सर्विस, SME साठी ब्राॅडब्रँड सर्विस आणि इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकस करू. जिओमधल्या गुंतवणुकीचा काळ संपला. आम्ही आता जिओला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.

पेट्रोलची किंमत स्थिर, डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

खुशखबर! 10 वाजता नाही, तर सकाळी या वेळेला सुरू होणार बँका

AGM मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020पर्यंत 5 लाख कोटी डाॅलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य ठेवलंय. मला वाटतं, भारत हे लक्ष्य सहज साध्य करू शकेल. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. ते पुढे म्हणाले, RIL सर्वात मोठी कर भरणारी कंपनी बनलीय. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीनं 67320 कोटी रुपये GST दिलं होतं. तर 12191 कोटी इन्कम टॅक्स भरला होता.

विक्रमांचा ‘विराट’ बादशाह! गांगुलीसह अनेक विक्रमवीरांना टाकले मागे

ते म्हणाले, जिओ फायबर आणि जिओ क्लाऊड सोल्युशनमुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळतील. आकाश अंबानी, ईशा यांनी जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा केली. यात 100 एमबीपीएसपासून 1 जीबीपीएस पर्यंत इंटरनेटचा स्पीड आहे.

SPECIAL REPORT: मधू इथे तर चंद्र तिथे; पुरामुळे नवरा-नवरी अडकले, लग्नाचा मुहूर्त टळला!

First published: August 12, 2019, 11:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading