मुकेश अंबानींची मोठी घोषणा, HD टीव्ही मिळणार मोफत

मुकेश अंबानींची मोठी घोषणा, HD टीव्ही मिळणार मोफत

Mukesh Ambani, Reliance Industries - मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनीच्या एजीएममध्ये बऱ्याच मोठ्या घोषणा केल्यात.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : रिलायन्स इंडस्ट्रीची AGM पार पडली. त्यात डिजिटल क्रांतीची सुरुवातच पाहायला मिळाली. आधीच जिओ फोन लोकप्रिय असताना त्यात भर पडलीय जिओ गिगा फायबरची. रिलायन्स इंडस्ट्रीच्या 2019च्या AGMमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. 4 सप्टेंबरपासून जिओ गिगा फायबर लाँच करण्याची घोषणा केलीय. जिओ गिगा फायबरचा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होतोय. त्याची रेंज 10 हजार रुपयापर्यंत आहे. कंपनीनं आणखी एक ऑफरही दिलीय. या ऑफरप्रमाणे 4D/4K टेलिव्हिजन सेट आणि 4K सेट अप बाॅक्स मोफत मिळेल. याबरोबर जिओचा मिक्स रिअल्टी (MR) मिळेल. तो असेल जिओ होलोबोर्ड.लवकरच याची विक्री सुरू होणार आहे.

मुकेश अंबानींनी केल्या या मोठ्या घोषणा

जिओ फायबर सर्विस 5 सप्टेंबरला लाँच होईल.

जिओ प्रीमियमचे ग्राहक रिलीज झालेला सिनेमा लगेच पाहू शकतील.

मुकेश अंबानी यांनी केली जिओ सेट टाॅप बाॅक्सची घोषणा

कंपनीनं जिओ पोस्ट पेड प्लस सर्विसही लाँच केलीय.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट 14 टेक्नाॅलाॅजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतेय.

जिओ फायबरचा वर्षाचा पॅक घेतला तर HD TV मिळेल.

700 ते 10 हजार रुपयांपर्यत जिओ फायबरच्या सुविधा

Reliance AGM 2019: सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याच दिवशी Jio वर येईल पाहता

जिओ होम फोन  500 रुपयांत अमेरिका आणि कॅऩडाला अनलिमिटेड कॉल

रिलिजच्या दिवशी काही चित्रपट पहाण्याची सुविधा

शॉपिंग , गेमिंग आणि शैक्षणिक साधन म्हणूनही वापर

क्लाऊड तंत्रज्ञान भारतात वाजवी दरात उपलब्ध करून देणार

1500 रुपयांपासून सुविधा उपलब्ध होणार

जिओ फायबरची सुविधा मिळणार 5 सप्टेंबरपासून, देशभरात करू शकणार मोफत फोन

मायक्रोसॉफ्ट सुविधा , व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि इतर सुविधा उपलब्ध होणार

1500 रुपयांपासून सुविधा उपलब्ध होणार

शॉपिंग , गेमिंग आणि शैक्षणिक साधन म्हणूनही वापर

टेलिव्हिजन आणि सेट टॉप बॉक्स जिओ फायबरसोबत मोफत

जिओ पोस्ट पेड सर्व्हिस

जिओ फस्ट जे फस्ट शो सुविधा 2020 च्या मध्यात

जिओ फायबरसाठी 15 मिलियन नोंदणी झालीय. ते म्हणाले, आम्ही होम ब्राॅडबँड सर्विस, एन्टरप्राइजेस ब्राॅडब्रँड सर्विस, SME साठी ब्राॅडब्रँड सर्विस आणि इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकस करू. जिओमधल्या गुंतवणुकीचा काळ संपला. आम्ही आता जिओला नव्या उंचीवर घेऊन जाऊ.

AGM मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020पर्यंत 5 लाख कोटी डाॅलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य ठेवलंय. मला वाटतं, भारत हे लक्ष्य सहज साध्य करू शकेल. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. ते पुढे म्हणाले, RIL सर्वात मोठी कर भरणारी कंपनी बनलीय. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीनं 67320 कोटी रुपये GST दिलं होतं. तर 12191 कोटी इन्कम टॅक्स भरला होता.

केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 01:17 PM IST

ताज्या बातम्या