Home /News /money /

बँकेच्या कामकाजासंबंधी नवीन नियम लागू, पैसे जमा करणे किंवा काढण्याआधी समजून घ्या

बँकेच्या कामकाजासंबंधी नवीन नियम लागू, पैसे जमा करणे किंवा काढण्याआधी समजून घ्या

नवीन नियम 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढण्यासाठी लागू होणार आहे. CBDT ने 10 मे रोजी एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. याशिवाय, कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडणे देखील आवश्यक असेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 मे : केंद्र सरकारने (Central Government) एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात (Bank Account) जमा करणे किंवा काढणे यासाठी नवीन नियम लागू केला आहे, जो 26 मे पासून लागू होणार आहे. याशिवाय बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते उघडण्यासाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. सरकारने वरील दोन्ही कार्यांसाठी आधार किंवा पॅन (Aadhar and PAN Number) अनिवार्य केले आहे. आता हा नियम 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढण्यासाठी लागू होणार आहे. CBDT ने 10 मे रोजी एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. याशिवाय, कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडणे देखील आवश्यक असेल. त्यामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. Pension Scheme: 'या' सरकारी योजनेतून निवृत्तीनंतर मिळेल पेन्शन, किती आणि कुठे करावी लागेल गुंतवणूक? चेक करा काय आहे नवीन नियम? नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला पॅन माहिती देणे आवश्यक असेल परंतु त्याच्याकडे पॅन नसेल तर तो आधारची बायोमेट्रिक ओळख देऊन हे काम करू शकतो. नांगिया अँड कंपनीचे शैलेश कुमार म्हणाले की, व्यवहाराच्या वेळी पॅन क्रमांक दिला की, कर अधिकाऱ्यांना व्यवहारांचा मागोवा घेणे सोपे होईल. महाराष्ट्रातील 'या' बँक ग्राहकांना मोठा झटका, RBI कडून पैसे काढण्यावर बंदी; ग्राहकांच्या पैशाचं आता काय होणार? तज्ञांचं मत काय? CBDT ने आयकर (15 वी सुधारणा) नियम, 2022 अंतर्गत नवीन नियम तयार केले आहेत. AKM ग्लोबलचे संदीप सहगल यांनी आशा व्यक्त केली की या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल, कारण यामुळे बँका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांची तक्रार करणे बंधनकारक असेल. ते म्हणाले, यामुळे सरकारला आर्थिक व्यवस्थेतील रोख व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. यामुळे संशयास्पद ठेवी आणि पैसे काढण्याशी संबंधित प्रक्रियेत कडकपणा येईल. आतापर्यंत, आधार किंवा पॅन आयकर संबंधित कामासाठी वापरला जातो. आयकर विभागाशी संबंधित प्रत्येक कामात पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे. त्याच वेळी जर एखाद्या व्यक्तीकडे मोठ्या रकमेच्या व्यवहाराच्या वेळी पॅन नसेल तर तो आधार कार्ड वापरू शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank services, Money

    पुढील बातम्या