जाहिरात
मराठी बातम्या / मनी / महाराष्ट्रातील 'या' बँक ग्राहकांना मोठा झटका, RBI कडून पैसे काढण्यावर बंदी; ग्राहकांच्या पैशाचं आता काय होणार?

महाराष्ट्रातील 'या' बँक ग्राहकांना मोठा झटका, RBI कडून पैसे काढण्यावर बंदी; ग्राहकांच्या पैशाचं आता काय होणार?

RBI

RBI

RBI च्या म्हणण्यानुसार, ठेवीदारांना सध्या बँकेत असलेली तरलता लक्षात घेऊन सर्व बचत, चालू किंवा इतर खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेतून पैसे काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र अटी व शर्तींनुसार ठेवींवर कर्ज वसूल केले जाऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महाराष्ट्रातील सहकारी बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूरस्थित महाशंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडची (Shankarrao Pujari Nutan Nagari Sahakari Bank) आर्थिक स्थिती गंभीर आहे. ती काम करण्याच्या स्थितीत नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर या बँकेचे खातेदार सध्या पैसे काढू शकणार नाहीत. मात्र बँकेचे 99.88 टक्के ठेवीदार डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) विमा योजनेच्या कक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवला जातो. रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेवर ही बंदी 13 मे 2022 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान बँकेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, ठेवीदारांना सध्या बँकेत असलेली तरलता लक्षात घेऊन सर्व बचत, चालू किंवा इतर खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेतून पैसे काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र अटी व शर्तींनुसार ठेवींवर कर्ज वसूल केले जाऊ शकते. CIBIL स्कोरबद्दल ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आहे का? कर्ज घेताना होतो फायदा आपले हे पाऊल बँकेचा परवाना रद्द करण्यासारखे मानले जाऊ नये, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. ही बँक रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही कर्जाचे आणि अनुदानाचे नूतनीकरण करू शकत नाही. याशिवाय कोणीही गुंतवणूक करू शकत नाही किंवा कोणतेही दायित्व घेऊ शकत नाही. निर्बंधांदरम्यान, बँक आपली कोणतीही मालमत्ता विकू शकत नाही. रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते फायद्याची, कशी आणि कोणते घटक ठरतील महत्वाचे, चेक करा DICGC म्हणजे काय? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेअंतर्गत, बँकांमध्ये जमा केलेल्या रकमेचा 5 लाख रुपयांपर्यंत विमा उतरवला जातो. यामुळे, बँक दिवाळखोर झाल्यास किंवा तिचा परवाना रद्द झाल्यास, ग्राहकांना अशी ठेव रक्कम गमावण्याचा धोका नाही. DICGC, रिझर्व्ह बँकेची उपकंपनी, बँक ठेवींवर विमा संरक्षण प्रदान करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात