मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आयकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 जूनला लाँच होणार नवीन Income Tax पोर्टल

आयकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 जूनला लाँच होणार नवीन Income Tax पोर्टल

प्राप्तिकर कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीची करदेयता वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना चार हप्त्यांमध्ये म्हणजेच 15 जुलै,15 सप्टेंबर,15 डिसेंबर आणि 15 मार्च पूर्वीचा आगाऊ कर भरावा लागेल. जर असे टॅक्स भरले नाही, तर करदात्याला दंड भरावा लागतो. आयकर नियमानुसार, करदात्यास 15, 45, 75 आणि 100 टक्के अशा चार हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरावा लागतो. जर करदाता अंतिम मुदतीत अग्रीम कर भरु शकला नाही तर कलम 234 बी आणि 234 सी अंतर्गत व्याज भरावे लागतं. जर तुम्ही 15 मार्चपर्यंतचा चौथा हप्ता भरला नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत तो 31 मार्चपूर्वी भरावा. 31 मार्चपर्यंत पेमेंट भरल्यास ती रक्कम आगाऊ कर समजला जातो.

प्राप्तिकर कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीची करदेयता वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना चार हप्त्यांमध्ये म्हणजेच 15 जुलै,15 सप्टेंबर,15 डिसेंबर आणि 15 मार्च पूर्वीचा आगाऊ कर भरावा लागेल. जर असे टॅक्स भरले नाही, तर करदात्याला दंड भरावा लागतो. आयकर नियमानुसार, करदात्यास 15, 45, 75 आणि 100 टक्के अशा चार हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरावा लागतो. जर करदाता अंतिम मुदतीत अग्रीम कर भरु शकला नाही तर कलम 234 बी आणि 234 सी अंतर्गत व्याज भरावे लागतं. जर तुम्ही 15 मार्चपर्यंतचा चौथा हप्ता भरला नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत तो 31 मार्चपूर्वी भरावा. 31 मार्चपर्यंत पेमेंट भरल्यास ती रक्कम आगाऊ कर समजला जातो.

केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे (Finance Ministry) येत्या 7 जून रोजी नवीन इन्कम टॅक्स पोर्टल (New Income Tax Portal) www.incometax.gov.in लाँच करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 02 जून: केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे (Finance Ministry) येत्या 7 जून रोजी नवीन इन्कम टॅक्स पोर्टल (New Income Tax Portal) www.incometax.gov.in लाँच करण्यात येणार आहे. हे नवीन पोर्टल अधिक प्रगत आणि करदात्यांसाठी अधिक सुटसुटीत असेल. करदात्यांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशानेच हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे. या आधी www.incometaxindiaefiling.gov.in हे पोर्टल कार्यरत होते. यामध्ये विवरणपत्र (ITR), लेखापरीक्षण अहवाल (Audit Report) आणि इतर अनेक फॉर्म ऑनलाइन भरण्यासह मूल्यांकन, अपील तसंच नोटिसांना प्रत्युत्तर आदी सुविधाही मिळत होत्या. या होत्या अडचणी सध्या अस्तित्त्वात असलेले पोर्टल योग्य प्रकारे कार्यरत असले तरी नियोजित तारखेच्या काळात त्याच्यावर काम करताना अडचणी येत असत. कागदपत्रे अपलोड करण्याची क्षमता कमी, ऑडिट अहवाल भरणे, मूल्यांकन किंवा नोटिसांना प्रत्युत्तर देणं यात अडथळे येत असत. त्याचप्रमाणे अनेक करदात्यांना हे पोर्टल गोंधळून टाकणारे होते. नवीन पोर्टलमधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये  -नवीन पोर्टल करदात्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांवर (Income Tax Return) त्वरित प्रक्रिया करू शकते. त्यामुळे करदात्यांना परतावे जलद मिळतील. -सर्व इंटरअॅक्शन्स, अपलोड किंवा प्रलंबित प्रक्रिया एकाच डॅशबोर्डवर दिसतील, ज्यामुळे करदात्यांना ते व्यवस्थित पूर्ण करता येईल. -विनामूल्य आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर (ITR preparation software) ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं उपलब्ध असेल आणि यात इंटरअॅक्टिव प्रश्न असतील जेणेकरुन करदात्यांना सहजपणे त्यांचे आयटीआर दाखल करता येतील. यात आधीच माहिती भरलेली असेल आणि यामुळे करदात्यांचे डेटा एंट्रीचे काम मोठ्या प्रमाणात कमी होईल. -डेस्कटॉपवर दिसणारी पोर्टलची सर्व कार्ये मोबाइल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध असतील, त्यामुळे मोबाइलवर कधीही ते वापरण्याची सुविधा मिळेल. हे वाचा-तुमचा Aadhar Card वरील फोटो तुम्हाला आवडत नाही? अशाप्रकारे करा बदल -नवीन पोर्टलवर नवीन ऑनलाइन कर भरण्याची व्यवस्था असेल आणि त्यामध्ये पेमेंटचे अनेक नवीन पर्याय दिले जातील. यामध्ये नेटबँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड आणि आरटीजीएस, एनईएफटीसारखे यांचा समावेश असेल. करदात्यांना कोणत्याही बँकेतून कर भरता येईल. तज्ज्ञांचे मत मनीकंट्रोलशी बोलताना सीए अभिषेक अनेजा (CA Abhishek Aneja) यांनी नवीन पोर्टलबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘सामान्य नागरिकांना या सेवा किती सहज आणि वेगानं मिळू शकतात यावर ई-गव्हर्नन्सचे यश आधारित आहे. करदात्यांसाठी रिटर्न भरणे, परतावा मिळवणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि नोटिसांना प्रतिसाद देणे या प्रक्रिया जितक्या सोप्या होतील, तितकं सोयीचं होईल. नवीन पोर्टलच्या विविध वैशिष्ट्यांमुळे करदात्यांच्या समाधानाच्या मापदंडात अधिकच वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. करदात्यांना सुविधा देण्यासह करबुडव्या लोकांना पकडणे हा देखील या पोर्टलचा उद्देश आहे. गेल्या काही वर्षांपासून प्राप्तिकर विभाग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ऑटोमॅटिक इंफॉर्मेशन सिस्टीम (Automatic Information System) एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राप्तिकर विभागातर्फे क्रेडिट कार्ड कंपन्या, करदात्यांच्या गुंतवणूकी आणि इतर खर्चाची माहिती एकत्र करणे आणि त्याचं विश्लेषण केलं जात आहे. करदात्यांच्या आकडेवारीचे सर्व बाजूंनी विश्लेषण केलं जातं. कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करण्यात येत आहे. हे वाचा-या व्यक्तीने 8 महिन्यात कमावले 30 लाख, तुम्ही देखील करू शकता हा व्यवसाय याशिवाय, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने सध्याच्या सेवा आणि मॉड्यूल्स सुधारण्यासाठी या नवीन ऑनलाइन पोर्टलची 3.0 ही आवृत्तीदेखील सुरू केली आहे. त्यात ई-शिक्षण, कंप्लायन्स, अत्याधुनिक हेल्पडेस्क, युजर  डॅशबोर्ड, सेल्फ रिपोर्टिंग टूल्स आणि  मास्टर डेटा सर्व्हिसेससारख्या (Master Data Services) नवीन साधनांचा समावेश करणं शक्य आहे. हे नवीन पोर्टल प्राप्तिकर, एमसीए आणि जीएसटी सारख्या विविध सरकारी विभागांना एकत्रित आणेल त्यामुळे सूचनांचे आदान प्रदान शक्य होईल. अर्थात हे नवीन प्राप्तिकर पोर्टल आपली उद्दिष्टे साध्य करू शकेल का आणि करदात्यांना, व्यावसायिकांना आणि प्राप्तिकर विभागाला सुलभता देऊ शकेल किंवा नाही हे काही काळानेच कळेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Income tax

पुढील बातम्या