• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून ऊसाच्या FRP मध्ये वाढ, असा होणार फायदा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून ऊसाच्या FRP मध्ये वाढ, असा होणार फायदा

देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 25 ऑगस्ट रोजी एका महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने ऊसाची प्रति क्विंटल किंमत 5 रुपये वाढवली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 25 ऑगस्ट रोजी एका महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने ऊसाची प्रति क्विंटल किंमत 5 रुपये वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीत ऊसाची FRP (Fair & remunerative price खरेदी दर) 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. मोदी सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली असून आता ऊसाचे खरेदी मुल्य वाढणार अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. दरम्यान एफआरपी वाढल्यामुळे साखरची MSP आणि एथेनॉलचे दर वाढण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर ऊसावरील वाजवी आणि मोबदला देणारी किंमत (FRP) 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. ऊस उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून सध्याच्या काळात ही त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. हे वाचा-चंदा कोचर यांच्या अडचणी वाढल्या, मनी लाँड्रिंग प्रकरणी ED ने दाखल केलं आरोपपत्र पीयूष गोयल यावेळी म्हणाले की, आजच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर 87 टक्के रिटर्न मिळेल. एफआरपीच्या माध्यमातून आम्ही हे सुनिश्चित करू इच्छित आहोत की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा अधिक मुल्य मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: