Home /News /money /

आता नोकरी मागू नका तर द्या! छोट्या जागेत सुरू करा साबणाचा व्यवसाय, महिन्याला होईल बंपर कमाई

आता नोकरी मागू नका तर द्या! छोट्या जागेत सुरू करा साबणाचा व्यवसाय, महिन्याला होईल बंपर कमाई

Business Idea: आजच्या युगात हजारो-लाखो लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून मोठी कमाई करायची आहे. जर तुम्ही देखील या लोकांमध्ये असाल तर तुम्ही साबण निर्मितीद्वारे दरमहा 50 हजार रुपये सहज कमवू शकता.

    मुंबई, 25 जून : सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत रोजगारांची (Jobs) संख्या घटल्याने अनेक जण उपजीविकेसाठी छोटासा का होईना, स्वतःचा बिझनेस सुरू करू इच्छितात. तुम्हालाही बिझनेस (Business) सुरू करायचा आहे का? मग इथे एक बिझनेस आयडिया (Business Idea) शेअर करत आहोत. कोणताही बिझनेस योग्य अभ्यास आणि पुरेपूर कष्ट करून केला, तर त्यातून मोठी कमाई करता येऊ शकते. अर्थातच, हा बिझनेसही त्याला अपवाद नाही. हा बिझनेस आहे साबण तयार करण्याचा आणि ते विकण्याचा. साबण (Soap Making Business) ही अशी वस्तू आहे, की ती समाजाच्या सर्व स्तरांतल्या नागरिकांची गरज आहे. त्यामुळे साबणाला मोठी मागणी असते. हिंदुस्तान युनिलिव्हरसह (HUL) अनेक कंपन्या देशात गेल्या कित्येक वर्षांपासून साबण उद्योगात आहेत. त्या मोठ्या कंपन्या आहेत. शिवाय त्यांच्या जाहिरातीही भरपूर असतात. त्यामुळे साहजिकच त्यांचा खप मोठा आहे. तरीही आपल्या बाजारपेठेत छोट्या साबण उत्पादकांनाही मोठा स्कोप आहे. मोठ्या कंपन्या वगळता अनेक छोटे साबण उत्पादक उद्योगही मोठी कमाई करत असल्याचं आढळून आलं आहे. साबण तयार करण्याची फॅक्टरी (Soap Factory) सुरू करायची असेल, तर त्यासाठी सुमारे सात लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते. या बिझनेससाठी 1000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या जागेची गरज असते. या जागेत साबणनिर्मितीची मशीन्स इन्स्टॉल करावी लागतील. त्यात एक्सट्रूडर मशीन, मिक्सर मशीन, डाय, कटिंग मशीन आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, साबणाच्या उत्पादनासाठी रॉ मटेरियल अर्थात कच्च्या मालाचीही गरज असतेच. घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्न या सगळ्याच्या साह्याने तुम्ही तुमचं प्रॉडक्ट तयार करा. त्याचं वेगळेपण सांगून विक्रीला सुरुवात करा. सुरुवातीला ब्रँडेड साबणाएवढी किंमत त्याला आकारता येणार नाही. म्हणूनच तुमच्या साबणाचा ब्रँड (Branding) बाजारात एस्टॅब्लिश करण्यासाठी चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी अंगीकारावी लागेल. वृत्तपत्रांसारख्या प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडियातूनही तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकता. सुरुवातीच्या काळात प्रॉडक्टवर 10 ते 15 टक्के एवढाच नफा मिळू शकेल; मात्र तुमचा ब्रँड बाजारात सेट होत गेला, की तुमचं प्रॉफिट मार्जिन 25 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतं. तुमच्या साबणाचा दर्जा, वेगळेपण या गोष्टी ग्राहकांना कळल्या, आवडल्या, तर महिन्याला 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवणं शक्य आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असतं. मुद्रा योजनेद्वारे (Mudra Scheme) कर्जपुरवठाही केला जातो. अशा विविध योजनांचा लाभ घेऊन कोणीही उद्योग सुरू करू शकतो. अर्थात, उद्योग सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
    First published:

    Tags: Business, Business News

    पुढील बातम्या