Home /News /money /

घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्न

घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्न

नोकरी करण्यापेक्षा एखादा बिझनेस (Business Tips) करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

    मुंबई, 25 जून : नोकरी करण्यापेक्षा एखादा बिझनेस (Business Tips) करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. कमीतकमी भांडवल गुंतवूनही असे व्यवसाय करता येऊ शकतात. या बिझनेसमधून घरबसल्या दरमहा चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. त्याशिवाय भांडवल कमी असल्यानं धोकाही कमी असतो. घराच्या टेरेसचा वापर करून काही बिझनेस करता येतात. यात तोटा होण्याची जोखिमही खूपच कमी असते. (Business On The Roof) टेरेस फार्मिंग, मोबाईल टॉवर, होर्डिंग आणि बॅनर टेरेसवर लावणं अशा प्रकारचे बिझनेस घरबसल्या तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतात. जाणून घेऊया या बिझनेसबद्दल. टेरेस फार्मिंग टेरेस फार्मिंग म्हणजे गच्चीवर शेती (Terrace Farming) करणं. तुमच्या घराला मोठी गच्ची म्हणजेच टेरेस असेल, तर तिथं शेती करता येईल. यासाठी मोठी गच्ची आणि ऊन या दोनच गोष्टींची आवश्यकता आहे. जितकी मोठी गच्ची असेल, तितकी अधिक झाडं लावता येतील. पर्यायानं उत्पादनही वाढेल. अशा प्रकारच्या शेतीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपं लावावी लागतात. पाण्यासाठी ड्रिप सिस्टिमचा वापर केला जातो. ज्या गच्चीवर चांगलं ऊन येत असेल, तिथे झाडं लावता येतात. मोबाईल टॉवर मोबाईलला नेटवर्क मिळण्यासाठी कंपन्या ठिकठिकाणी त्यांचे टॉवर्स उभारताना पाहिलं असेल. मात्र ही बिझनेसची आयडिया फार कोणाच्या लक्षात येत नाही. तुमच्या गच्चीवर किंवा जागेवर मोबाईल टॉवर (Mobile Network Tower) उभारला, तर मोबाईल कंपनी तुम्हाला दरमहा ठराविक भाडं देते. त्यासाठी त्या ठिकाणच्या प्रशासनाची परवानगी लागते. ती मिळाल्यावर तुम्ही मोबाईल कंपनीशी संपर्क साधून टॉवर उभारून घेऊ शकता. (शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरेंना देव पावला, म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातून घराची लॉटरी, स्वत:चं हक्काचं घर होणार) होर्डिंग आणि बॅनर तुमचं घर रस्त्याच्या कडेला असेल किंवा तुमचं छत लांबूनही दृष्टीस पडत असेल, तर या गोष्टीचा बिझनेस म्हणून वापर करून घेता येऊ शकतो. तुमच्या घराच्या बाहेर किंवा छतावर एखादं होर्डिंग (Hoarding), बॅनर लावला, तर त्यातून तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता. जाहिरातीचं काम करणाऱ्या अनेक कंपन्या असतात. त्यासाठीही परवानगी मिळवणं त्या कंपन्या करतात व तुमच्या घराबाहेर होर्डिंग लावतात. तुमचं घर किती मोक्याच्या ठिकाणी आहे, यावर त्यातून मिळणारं उत्पन्न अवलंबून असतं. सोलर पॅनल सोलर पॅनल (Solar Panel) लावून वीजनिर्मिती करणं आता सहज आणि सोपंही झालं आहे. टेरेसमध्ये हे पॅनल लावून त्याद्वारे वीजनिर्मिती करून ही वीज तुम्ही विकू शकता. हाही एक उत्पन्नाचा मार्ग आहे. अर्थात स्वतःच्या घरातील विजेचा खर्च कमी करणंही त्यातून शक्य होईल. सध्या सरकार सौर ऊर्जेच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे. सोलर पॅनल घेण्यासाठी सरकार सुलभ हफ्त्यांत कर्ज उपलब्ध करून देतं. अंदाजे एक लाख रुपयांच्या भांडवलावर तुम्ही हा बिझनेस सुरु करू शकता. घराचा किंवा घराच्या गच्चीचा फायदा करून घरबसल्या व्यवसाय करता येतो व चांगलं उत्पन्नही मिळवता येतं. त्यासाठी घराचं मोक्याचं ठिकाण, नैसर्गिक गोष्टींची उपलब्धता व जुजबी भांडवल या काही गोष्टींची आवश्यकता आहे.
    First published:

    पुढील बातम्या