तीन दिवसानंतर स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, हे आहेत आजचे दर

तीन दिवसानंतर स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, हे आहेत आजचे दर

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : बजेटनंतर आज पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट झालेली पाहायला मिळते. याआधी सोमवारी फक्त डिझेलच्या दरांमध्ये घट पाहायला मिळाली पण आता पेट्रोलचे दरदेखील कमी झाले आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरांमध्ये 6 पैसे प्रति लीटर असा घट होता तर डिझेलच्या दरांमध्ये 10 पैसे प्रति लीटर असा घट पाहायला मिळाला.

5 जुलैला मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला पहिला बजेट सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी सितारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलवर 1 रुपये सेस आणि 1 रुपये एक्साईज ड्यूटी आकरण्यात येणार आहे. त्यामुळे बजेटच्या दुसऱ्याच दिवशी इंधनाचे दर वाढले होते.

इंडियन ऑईल(IOC)च्या वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 78.52 रुपये आहे तर डिझेल 69.69 रुपये आहे. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 72.90 रुपये आहे तर डिझेलची किंमत 66.46 रुपये आहे. कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 75.12 रुपये आहे तर डीझलची किंमत 68.48 रुपये आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 75.70 तर डिजेल 70.23 रुपयांवर आहे आणि नोएडामध्ये 72.23 रुपये आणि डिझेल 65.555 रुपयांवर आहे.

देशाच्या ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून (HPCL, BPCL, IOC)रोज इंधनाच्या किंमतीचा आढावा घेतला जातो. सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. तर दर ठरवण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो अशी माहिती ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून देण्य़ात आली आहे.

दरम्यान, रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरानुसारदेखील इंधनाच्या दरांच्या किंमतीत बदल होतात. त्यामुळे बजेट सादर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली होती तर ती आता तिसऱ्या दिवशी कमी झालेली पाहायला मिळते.

बजेटच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्या होत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती!

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे. दरम्यान, Petrol, Diesel आणि सोनं महाग झालं होतं. मुंबईतही इंधानाचे दर वाढले होते. अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर एक रुपया सेझ लावल्यानंतर पेट्रोल - डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल 78.47 रुपये झालं होतं तर हेच पेट्रोलचे दर 5 जुलै रोजी 76.18 रुपये इतके होते.

5 जुलैला पुण्यात पेट्रोलचे दर लीटर मागे 78.47 रुपये तर डिझेलचा दर 68.72 रुपये इतका होता. बजेमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये सेस लावण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम आता इंधानाच्या किंमतीवर दिसणार आहे. शुक्रवारी सेस लावण्यात आला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये 2:30 रुपये प्रति लीटरने वाढ झाली होती.

VIDEO: पहिल्या पावसानंतर 3 सापांचं मिलन कॅमेऱ्यात कैद!

First published: July 9, 2019, 11:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading