जाहिरात
मराठी बातम्या / मनी / चांदीचे दागिने आणि कॉइनवरही हॉलमार्किंग आवश्यक? काय आहे नियम

चांदीचे दागिने आणि कॉइनवरही हॉलमार्किंग आवश्यक? काय आहे नियम

चांदीचे दागिने आणि कॉइनवरही हॉलमार्किंग आवश्यक? काय आहे नियम

सोन्यावर हॉलमार्किंग असणं बंधनकारक आहे; पण हा नियम चांदीच्या दागिन्यांसाठी लागू होतो का?

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : सोन्या-चांदीच्या दागिन्यांचं आकर्षण नसलेल्या व्यक्ती विरळाच असतात. भारतात हे आकर्षण जरा जास्तच असतं. लग्न, लहानमोठे सण इत्यादींचं निमित्त साधून मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते. सोन्याचे दागिने खरेदी करण्याची अनेकांना फार हौस असते. त्यातच आता सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यावर हॉलमार्किंग असणं बंधनकारक आहे; पण हा नियम चांदीच्या दागिन्यांसाठी लागू होतो का, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. ग्राहकांना योग्य, दर्जेदार आणि शुद्ध दागिने मिळावेत, यासाठी सरकारने 1 जून 2022 पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केलं. या तारखेनंतर कोणताही ज्वेलर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही; पण चांदीचे दागिने आणि नाण्यांवरही हॉलमार्किंग अनिवार्य आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून, सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. या वेळी ज्वेलरने हॉलमार्कशिवाय चांदीचे दागिने का दिले, असा प्रश्न कोणत्याही ग्राहकाच्या मनात येऊ शकतो; मात्र हॉलमार्किंगचा नियम चांदीच्या बाबतीत अनिवार्य नाही. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ; वाचा काय आहे आता नवीन भाव? ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’नुसार हॉलमार्किंग करून ज्वेलर्सला चांदीचे दागिने विकायचे असतील, तर ते तसे विकू शकतात; पण चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक नाही. कारण सरकारने चांदीच्या दागिन्यांसाठी हा नियम अनिवार्य केलेला नाही. परंतु कोणत्याही ज्वेलरला हवं असल्यास तो त्याच्या स्तरावर हॉलमार्क करून चांदीचे दागिने विकू शकतो. यामुळे दागिन्यांची शुद्धता वाढेल आणि ग्राहकांमध्ये त्या ज्वेलरकडच्या दागिन्यांवरचा विश्वास वाढेल. याशिवाय, चांदीच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकाला समजेल, की त्याने कोणत्या दर्जाचे दागिने खरेदी केले आहेत. कारण ज्वेलर्स अनेकदा चांदीमध्ये शिसं घालतात. त्यामुळे चांदीचे दागिने किंवा भांडी बनवणं सोपं होतं. अनेकजण खाण्यापिण्यासाठीही चांदीची भांडी वापरतात. अशा परिस्थितीत त्या भांड्यात शिशाचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या दागिन्यांचं हॉलमार्किंग केलं, तर खरेदी करीत असलेल्या चांदीच्या दागिन्यांमध्ये किंवा भांड्यांमध्ये शिसं आहे का नाही आणि असल्यास किती आहे, हेसुद्धा कळेल. दिवाळीपूर्वी सोनं झालं स्वस्त! सणासुदीच्या काळात खरेदी करण्याची चांगली संधी ग्राहकाला द्यावं लागतं शुल्क चांदीच्या दागिन्यावर हॉलमार्किंग हवं असल्यास तशी मागणी ग्राहक ज्वेलरकडे करू शकतो. यासाठी ज्वेलर ग्राहकांकडून हॉलमार्किंगचं शुल्क घेऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक सर्वांत प्रथम दागिन्यांची ऑर्डर देतो आणि ज्वेलर ते दागिने संबंधित केंद्राकडे हॉलमार्किंगसाठी पाठवतो. त्यानंतर दागिन्यांवर हॉलमार्किंग झाल्यानंतर ज्वेलर ते ग्राहकाला देईल. सोन्याच्या दागिन्यांवर जसा हॉलमार्किंग मार्क (चिन्ह) असतो, तसाच हॉलमार्किंग मार्क चांदीच्या दागिन्यांवरही असतो. दागिन्यांवर बीआयएस मार्कसह चांदी असं लिहिलेलं असते. चांदीची शुद्धता किंवा सूक्ष्मतादेखील लिहिली जाते. याशिवाय, ज्या केंद्रावर हॉलमार्किंग केलं आहे, त्या केंद्राचा आयडेंटिफिकेशन मार्क, ज्वेलरचा मार्क व मॅन्युफॅक्चरर आयडेंटिफिकेशन मार्क देणं गरजेचं असतं. चांदीच्या दागिन्यांसह नाण्यांवरचं हॉलमार्किंग नियमानुसार अनिवार्य नसले तरी ग्राहकांनी त्यासाठी आग्रह धरणं केव्हाही चांगलं ठरतं. यामुळे दागिने खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात