दिल्ली, 6 ऑक्टोबर : एचडीएफसी सिक्युरिटीज नुसार, दिल्लीत आज गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. जागतिक तेजी आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे सोन्याच्या किंमती 497 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सोन्याच्या किंमत प्रति 10 ग्रॅम 52,220 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 51,723 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावली होती. तर चांदीचा भाव मात्र 80 रुपयांनी घसरून 61,685 रुपये प्रति किलोवरून 61,605 रुपये झाला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी घसरून 81.66 वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,722.6 डॉलर प्रति पौंड तर चांदीचा भाव 20.68 डॉलर प्रति पौंड होता. रुपयाचे अवमूल्यन, उच्च आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती आणि सणासुदीची मागणी आणि कमी पुरवठा यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतीही उंचावल्या, असे HDFC सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले. हेही वाचा - सणासुदीला शेतकऱ्यांना मोठा फटका, MSP जाहीर करण्यासाठी उशीर सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. दसरा-दिवाळी म्हटलं, की आपल्याकडे नवीन वस्तूंची खरेदी होते. विशेषत: दिवाळीच्यावेळी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या वर्षीही नागरिकांचा सोनेखरेदीकडे कल असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशातच तुम्ही जर सोनाराकडे म्हणजेच तुमच्या ज्वेलरकडे सोनं खरेदीसाठी गेलात आणि त्याने तुम्हाला सोनं देण्यास नकार दिला तर? दागिन्यांऐवजी तुमच्या सोनाराने तुम्हाला डिजिटल सोनं खरेदी करण्यासाठी अॅपची लिंक दिली तर? यात आश्चर्य वाटून घेण्याची काहीही गरज नाही. कारण, या वर्षी दिवाळीच्या काळात सर्रासपणे असं चित्र दिसू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.