जाहिरात
मराठी बातम्या / मनी / दिवाळीपूर्वी सोनं झालं स्वस्त! सणासुदीच्या काळात खरेदी करण्याची चांगली संधी

दिवाळीपूर्वी सोनं झालं स्वस्त! सणासुदीच्या काळात खरेदी करण्याची चांगली संधी

दिवाळीपूर्वी सोनं झालं स्वस्त! सणासुदीच्या काळात खरेदी करण्याची चांगली संधी

या सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात घट झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर : नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदी खेरदीची हौस भागवत असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर आज तुमच्यासाठी चांगली बातमी आली आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूचे दर घसरल्याने राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सोन्याचा भाव 435 रुपयांनी घसरून 49,282 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे. मागील व्यवहारात, सोनं 49,717 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावलं होतं. तर चांदीचा भावही 1,600 रुपयांनी घसरून 54,765 रुपये प्रतिकिलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,615.7 डॉलर प्रति औंस होता, तर चांदीचा भाव 18 डॉलर प्रति औंस वर घसरला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, “गुंतवणूकदार जोखीम घेण्यापासून दूर राहत असल्याने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची मागणी 435 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाली. दागिन्यांची मागणी वाढू शकते सणासुदीच्या काळात या दोन्ही धातूंच्या किमती कमी असल्याने दागिन्यांची मागणी वाढू शकते. मात्र, सोन्या-चांदीच्या सध्याच्या किमती गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. प्रत्यक्षात ही किंमत सप्टेंबर 2020 च्या तुलनेत आज खूपच कमी आहे. वाचा - आता मोटू-पतलू बनवणार सर्वांना टॅक्स एक्स्पर्ट, गेम खेळत शिका कर रचनेतील बारकावे सोन्याची शुद्धता कशी तपासायची? केंद्र सरकारने जारी केलेल्या बीआयएस केअर अॅपद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही खरेदी केलेले सोने खरे आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला सोन्याच्या गुणवत्तेबद्दल शंका असेल तर तुम्ही त्याची माहिती अॅपवर टाकू शकता आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून सोने खरेदी केले आहे त्या ठिकाणाबाबत तक्रारही करू शकता. तुमच्या तक्रारीवर संबंधित विभागाने केलेल्या कारवाईचीही माहिती मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अमेरिकन चलनाच्या मजबूतीमुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया 40 पैशांनी घसरून 81.93 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. गुंतवणूकदारांमध्ये जोखीम टाळण्याच्या भावनेनेही रुपयावर दबाव आणला. या संदर्भात परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि परदेशी निधीचा ओघ यामुळे गुंतवणूकदारांच्या मनोवृत्तीत नरमाई आली आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपया 81.90 वर उघडला. यानंतर तो 81.93 पर्यंत घसरला. गेल्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे मंगळवारी, अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 14 पैशांनी वाढून 81.53 प्रति डॉलर झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात