मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नवरात्रीनिमित्त जाणून घ्या आर्थिक नियोजनाची 9 आवश्यक पावलं, Financial Goal गाठण्यास होईल मदत

नवरात्रीनिमित्त जाणून घ्या आर्थिक नियोजनाची 9 आवश्यक पावलं, Financial Goal गाठण्यास होईल मदत

कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं. आर्थिक बाबींमध्येही नियोजन गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning Tips) करणं अत्यावश्यक आहे.

कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं. आर्थिक बाबींमध्येही नियोजन गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning Tips) करणं अत्यावश्यक आहे.

कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं. आर्थिक बाबींमध्येही नियोजन गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning Tips) करणं अत्यावश्यक आहे.

मुंबई, 07 ऑक्टोबर: कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचं असतं. आर्थिक बाबींमध्येही नियोजन गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning Tips) करणं अत्यावश्यक आहे. तरुण वयात किंवा अगदी करिअरच्या सुरूवातीच्या काळात आर्थिक नियोजन करण्याची गरज असते. तुम्ही ते केलंत तर यशस्वी होऊ शकता. आजपासून (7 ऑक्टोबर 2021) नवरात्र (Navratri 2021) सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो. या पूजेबरोबरच जर आपण आपल्या आर्थिक नियोजनाच्या दिशेनं पावलं टाकली तर भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक नियोजन म्हणजे आपलं उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचं एक चक्रच असतं. भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करता येतील अशा 9 बाबींची आपण माहिती घेऊया. 1. आर्थिक ध्येय निश्चित करा आर्थिक नियोजनाची सुरुवात आर्थिक ध्येय (Set Financial Goal) निश्चित करण्यापासून होते. भविष्यात तुम्हाला कशासाठी गुंतवणूक करायची आहे हे आधी ठरवा. भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याच्या (Financial Independence) दिशेने हे पहिलं पाऊल आहे. आता 'महाराजा'वर असणार TATA चा हक्क? Air India विक्रीबाबत सरकार उद्या करणार घोषणा 2. जोखीम समजून घ्या कोणत्याही गुंतवणूकीचा (Investment ) पर्याय निवडण्यापूर्वी, तुम्ही तुमची जोखीम किती आहे हे समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण गुंतवणुकीसाठी ज्या पर्यायाची निवड करणार आहात त्याच्याशी संबंधित जोखीम सहन करण्यास आपण किती सक्षम आहात. त्यानंतर तुमच्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडा. 3. अवाजवी खर्च टाळा आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, तुम्ही पैशाशी संबंधित वाईट सवयी सोडा. म्हणजेच अवाजवी खर्च करू नका. तुम्ही बचत करा आणि मग गुंतवणूक करा. आवश्यक तिथे खर्च करा. SBI Gold Deposit Scheme: घरातील ठेवलेल्या सोन्यातून करा कमाई, एसबीआय देतंय संधी 4. गुंतवणुकीत विविधता ठेवा गुंतवणुकीसाठी तुम्ही जो पर्याय निवडत आहात त्यात विविधता ठेवा. यामुळे गुंतवणुकीचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ वाढण्यास मदत होईल. 5. गुंतवणुकीचं पुनरावलोकन करा आर्थिक नियोजन केवळ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम उत्पादनं निवडण्यापुरतं मर्यादित नाही. तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचं पुनरावलोकन करत राहा. त्यानुसार तुमच्या गुंतवणुकीचा मार्ग बदला. 6. आर्थिक सल्लागाराची मदत घ्या आर्थिक नियोजन करताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. आपल्या यशस्वी आर्थिक जीवनात मार्गदर्शक उपयुक्त ठरू शकतो. 7. निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करा अनेकदा आपण निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाबाबत गंभीर नसतो. पण आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज करणं. चांगल्या सेवानिवृत्त आयुष्यासाठी एक चांगला निधी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आजही महागलं इंधन, मुंबईकरांना 1 लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 109 रुपये 8. फायनान्शिअल माहिती बाळगा आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे काही मूलभूत ज्ञान असलं पाहिजे. त्यामुळे तुमचं आर्थिक ज्ञान वाढवून तुमच्या पैशाचं व्यवस्थापन चांगलं होईल. 9. सर्वसमावेश दृष्टीकोन ठेवा आर्थिक नियोजनात कोणत्याही एका दृष्टिकोनाला चिकटून राहू नका. सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक आहे. तुमचं आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य वाटेल अशा मालमत्तांचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करणं आवश्यक आहे. आर्थिक नियोजनासाठी वरील बाबींचा विचार करणं अत्यावश्यक आहे. भविष्यातील आर्थिक स्थिरतेसाठी आतापासून नियोजन करणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Finance, Financial benefits, Financial need, Money, Personal finance, Savings and investments

पुढील बातम्या