मुंबई : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. फळबागा आणि त्यासोबत धान्य देखील पिकवलं जातं. बऱ्याचवेळा अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, खराब बियाणे यासारख्या अनेक संकटांमुळे शेतकरी पुरता कोलमडून पडतो. त्याचं उत्पन्न कमी होतं. अशावेळी दुबार पेरणी करणं महागाईमुळे शक्य होत नाही. तेवढे पैसे हातात नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सब्सिडी आणि योजना आणल्या आहेत.
केंद्र सरकारच्या अशा 10 योजना आहेत ज्या प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेबद्दल माहिती हवी. या कोणत्या योजना आहेत आणि त्याचा कसा लाभ घ्यायचा याबद्दल जाणून घेऊया.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना- 'प्रत्येक शेताला पाणी' हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविली जात आहे. केंद्र सरकारच्या कृषी सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतीचा विस्तार करणे, पाण्याचा अति वापर टाळणं पण पिकाला योग्य पाणी देणं शक्य होतं.
सिंचनासाठी लागणारे यंत्र महाग असतात त्यामुळे सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana या पोर्टलवर मिळू शकणार आहे.
एकदोन नाही तर तब्बल 700 वेगवेगळ्या फळांची बाग; शेतकऱ्याचं पालटवलं नशीब; कशी साधली किमया?
किसान क्रेडिट कार्ड योजना- पेरणीपासून ते पिकांच्या विक्रीपर्यंत शेतीत भरपूर पैसा खर्च केला जातो. कोणत्याही अडचणीशिवाय शेतीचा एक हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बऱ्याचदा पुरेसे पैसे नसतात अशावेळी या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.
अनेकदा पैशाअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती अर्धवट सोडावी लागते. यासाठीच सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. यासाठीचे नियम अटी आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना PM-Kisan Samman Nidhi या पोर्टलवर मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना- सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका शेतीला बसतो. बऱ्याचदा वादळ वाऱ्यामुळे किंवा दुष्काळ पडल्याने शेतीचं नुकसान होतं. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
Farmer Success Story : शेती मातीशी नाळ असलेल्या तरूणाची उंच भरारी, महिन्याला कमवतो तब्बल एक लाख
या संकटातून शेतकऱ्याला खचू न देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरवला जातो. यासंबंधित सविस्तर माहिती शेतकऱ्यांना Pradhan Mantri Fasal Bima Yojana - Crop Insurance / PMFBY - Crop Insurance या वेबसाईटवर मिळू शकणार आहे.
मृदा आरोग्य कार्ड योजना - उत्तम पिक येण्यासाठी जमिनीची पोत उत्तम लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मातीचे आरोग्य जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. याची माहिती तुम्हाला Soil Health Card/ dac.gov.in या वेबसाईटवर मिळू शकते.
प्रधानमंत्री कुसुम योजना- बऱ्याचदा शेतकऱ्याला येणारं लाईटबिल हे खूप जास्त असतं. त्यामुळे पंपासाठी किंवा अनेक कामं ही विजेऐवजी सौरऊर्जेवर करण्यात यावीत यासाठी सरकारचा कल आहे. सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं खूप जास्त महाग आहेत. त्यामुळे ती कमी दरात शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ही योजना चालवली जाते.
याची माहिती शेतकऱ्यांना PM Kusum Yojana pmkusumyojna.co.in या वेबसाईटवर मिळणार आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार सौरपंप खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 30 टक्के अनुदान देते. उर्वरित 30 टक्के पेमेंटसाठी शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा दिली जाते.
वटवाघळं करत होते द्राक्षाचं नुकसान, शेतकऱ्याने अशी घडवली अद्दल पाहा PHOTO
पीएम किसान मानधान योजना- आयुष्यभर काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांना आपल्या वृद्धापकाळासाठी पैसे साठवता येत नाहीत. ही अडचण ओळखून केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी MAANDHAN | CSC e-Governance Services India Limited या बेसाईटवर रजिस्ट्रेशन करा तिथे सविस्तर माहिती मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना - या योजनेंतर्गत 2 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेकऱ्यांना सरकार तीन टप्प्यांमध्ये प्रत्येक वर्षाला दोन दोन हजार रुपये म्हणजे 6000 रुपये देते. यामुळे शेतकरी आपल्या छोट्या मोठ्या गरजा त्यातून पूर्ण करू शकेल आणि शेतीमध्ये त्याला फायदा होईल हा यामागचा हेतू आहे.
राष्ट्रीय कृषि बाजार या ई-नाम - या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला eNam पोर्टलवर जाऊन तिथे भेट द्यावी लागेल. तिथे आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. मध्यस्थांच्या शोषणापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि ते आपली पिके वाजवी किंमतीत विकू शकतात. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-नाम योजनाही सुरू केली आहे.
नागपुरच्या तरुणाने शहरातील नोकरी सोडली, अन् आता रोपवाटिकेतून दिला इतरांनाही रोजगार
या योजनेअंतर्गत शेतकरी घरबसल्या पिकासाठी बोली लावून आपला माल देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकू शकतात. ई-नाम हे ऑनलाइन ट्रेडिंग पोर्टल आहे, ज्यावर शेतकऱ्याला आपली नोंदणी आणि पिकाची माहिती द्यावी लागते.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान - या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला National Horticulture Board (nhb.gov.in) या वेबसाईटवर मिळणार आहे. बागायतदार शेतकऱ्यांना योग्य ट्रेनिंग, सब्सिडी आणि आर्थिक मदत दिली जाते. बागायतदार शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी बाग फुलवायची याचं ज्ञान सोप्या शब्दात दिलं जातं.
प्रधानमंत्री किसान निर्माता संगठन योजना - या योजनेंतर्गत सरकार 15 लाख रुपये देते. या योजनेत 11 शेतकऱ्यांना मिळून एक गट तयार करायचा असतो. या शेतकऱ्यांना ही रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते. या योजनेची अधिक माहिती तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके आणि कृषी यंत्रसामग्री खरेदीची सोय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Money, Scheme, State goverment, Sugarcane farmer