फळबागा म्हटलं की प्राणी पक्षी नाही तर हवामान काही ना काही शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतावर संकट येतंच. पण या अडचणीला शेतकऱ्याने धाडसाने तोंड दिलं. पक्षाला अशी अद्दल घडवली की बस्स, सतत फळबागेवर हल्ला करणाऱ्या शेतकऱ्याने नामी शक्कल लढवली आणि आपलं पिक वाचवलं आहे. या शेतकऱ्याचं कौतुक होत आहे.
हुशार शेतकऱ्यांनी त्यावर देखील एक शानदार उपाय शोधून काढला. चक्क मासे पकडण्यासाठी कोळी लोक जी जाळी वापरतात ती जाळी द्राक्षबागांवर अंथरून वटवाघलांच्या होणाऱ्या हल्ल्यांना चांगलीच मात दिली आहे.
वटवाघळे द्राक्ष बागेवर रात्रीची हल्ले करतात. आणि आपल्या टोकदार चोचीने द्राक्षाचं नुकसान करतात. सकाळी पाहिले तर बागेत द्राक्षांचा अक्षरशः सडा पडलेला दिसून येतो.
वटवाघळांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचें लाखों रुपयांचे नुकसान होते. आता ही झाली अंथरल्याने वटवाघळे द्राक्षांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी हा माशांची जाळी लावण्याचा जुगाड सुरू केला आणि तो चांगल्या प्रकारे वर्क आऊट होताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं या फोटोमधून दिसत आहे.