मुंबई : तुमच्या स्वप्नातलं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हडाने 16 ते 44 लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. 6 जानेवारीपासून म्हाडासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन करून म्हाडासाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला घर आधी लागलं असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. तुम्ही तुम्हाला जर या घरासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही mhada gov in MHADA हाउसिंग लॉटरी या वेबसाईटवर जाऊन भेट द्या. तिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हाडाच्या सूचनांचा बॉक्स दिसेल. याशिवाय वर पेज सुरू झाल्यावर लॉगइन आणि रजिस्टर असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील.
Pune Mhada Lottery 2023 : पुण्यात बजेटमधील घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी, पाहा काय आहेत अटीकसा करायचा अर्ज? तुम्हाला रजिस्ट्रेशन पर्याय निवडायचा आहे. तुम्ही तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची सगळी माहिती भरायची आहे. यासोबत आधार कार्ड नंबर आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर देखील द्यायचा आहे. हे सगळं सबमिट करा. पुढे तुमच्या कामाचे डिटेल्स, पगार किंवा व्यावसायिक असाल तर त्याचे डिटेल्स भरा. तुम्ही जर कोट्यातून घर घेणार असाल तर त्याची माहिती आणि सोबत कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज कशी पूर्ण कराल? अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हाडासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 फेब्रुवारी आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज आणि पेमेंट करू शकता. याशिवाय अर्ज करणाऱ्याचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला हवं, त्याच्या नावावर कोणतंही घर नसावं. 15 वर्षांपासून तो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारा असला तरी चालू शकतं. या लॉटरी अंतर्गत कमी उत्पन्न गटातील लोकांना या योजनेचा फायदा होतो. त्यामुळे घर घेण्याचं स्वप्न कमी उत्पन्न गटातील लोकांचं पूर्ण होतं. तुम्ही म्हाडासाठी अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही अर्ज करू शकता.
Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा आणि घर घ्याकोणत्या चुका टाळा - तुमचं नाव, पत्ता आणि कामाची माहिती योग्य द्या, यामध्ये कुठेही तफावत आढळल्यास तुम्हाला घर मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात - रजिस्ट्रेशन आणि पेमेंट रिसिट दोन्ही डाउनलोड करून मेलवरही ठेवा, चुकून हार्ड कॉपी कुठे गहाळ झाली तर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी राहील - फाइल तयार करताना तीन फाइल तयार करा, एक बँकेसाठी, दुसरी म्हाडा ऑफिससाठी आणि तिसरी फाइल तुमच्यासाठी तुमच्याकडे असायला हवी बॅकअपसाठी - सगळ्या डॉक्युमेंट ऑरिजनल आणि त्यासोबत झेरॉक्सचीही ट्रू कॉपी किंवा सेल्फ अटेस्टेड करून घ्या - कागदपत्रातील माहिती आणि तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये साम्य असायला हवं, नाहीतर तुमचं नाव बाद केलं जाऊ शकतं.