मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! कृषी आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांनी वाढ

बहुतांश कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे, परंतु एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये खाद्यतेलाची निर्यात 2020-21 मधील याच कालावधीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी घसरून USD 626 दशलक्ष झाली आहे.

बहुतांश कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे, परंतु एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये खाद्यतेलाची निर्यात 2020-21 मधील याच कालावधीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी घसरून USD 626 दशलक्ष झाली आहे.

बहुतांश कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे, परंतु एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये खाद्यतेलाची निर्यात 2020-21 मधील याच कालावधीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी घसरून USD 626 दशलक्ष झाली आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 05 डिसेंबर : कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांना न जुमानता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2020-21 मधील US$ 11,671 दशलक्षच्या तुलनेत एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण बास्केट अंतर्गत उत्पादनांची निर्यात US$ 13,261 दशलक्ष इतकी वाढली आहे. 2021-22 मध्ये APEDA बास्केट उत्पादनांतर्गत निर्यातीचे लक्ष्य USD 23,713 दशलक्ष ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या मते, एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये एकूण APEDA बास्केट निर्यातीत तांदळाचा वाटा 45 टक्क्यांहून अधिक होता. एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 या कालावधीत तांदूळ निर्यातीने US$5937 दशलक्ष इतके परकीय चलन मिळवले. 2020-21 मध्ये ते USD 5,341 दशलक्षवर पोहोचले. याबाबत टीव्ही 9 ने माहिती दिली आहे. पोल्ट्री उत्पादनांची निर्यात किती वाढली एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात 12 टक्क्यांनी वाढून USD 2,665 दशलक्ष झाली आहे जी 2020-21 च्या त्याच आठ महिन्यांच्या कालावधीत USD 2,371 दशलक्ष होती. एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 दरम्यान फळे आणि भाज्यांची निर्यात 12 टक्क्यांनी वाढून USD 1,720 दशलक्ष झाली आहे, जी एप्रिल-नोव्हेंबर 2020-21 मध्ये USD 1,536 दशलक्ष होती. USD 302 दशलक्ष किमतीची काजू निर्यात एप्रिल-नोव्हेंबर 2020-21 मधील US$ 1,127 दशलक्षच्या तुलनेत एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 दरम्यान प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने आणि विविध प्रक्रिया केलेल्या वस्तूंची निर्यात 26 टक्क्यांनी वाढून US$ 1,418 दशलक्षवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत काजू निर्यात 29 टक्क्यांनी वाढून USD 302 दशलक्ष झाली आहे. हे वाचा - टेन्शन कमी होणार; आता पेट्रोल पंपावरच मिळणार Electric Vehicles चार्जिंगची सुविधा खाद्यतेलाची निर्यात घटली बहुतांश कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे, परंतु एप्रिल-नोव्हेंबर 2021-22 मध्ये खाद्यतेलाची निर्यात 2020-21 मधील याच कालावधीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी घसरून USD 626 दशलक्ष झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2021-22 दरम्यान फळे आणि भाज्यांची निर्यात US$ 1720 दशलक्ष इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ते केवळ 1536 दशलक्ष अमेरिकन डॉलर होते. APEDA राज्य सरकारांशी संबंधित आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. APEDA चे अध्यक्ष डॉ. एम अंगमुथू म्हणाले, “आम्ही कृषी निर्यात धोरण, 2018 चे उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारांच्या सहकार्याने क्लस्टरवर लक्ष केंद्रित करून निर्यातीला चालना देत आहोत. हे वाचा - मोठी बातमी! Google नं Work From Home बाबत घेतला मोठा निर्णय; अनिश्चित काळासाठी WFO केलं Postponed APEDA कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांशी निगडीत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, तामिळनाडू, आसाम, पंजाब, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश, मिझोराम आणि मेघालय यांनी निर्यातीसाठी राज्य विशिष्ट कृती योजनांना अंतिम रूप दिले आहे. इतर राज्ये याला अंतिम स्वरूप देण्याच्या विविध टप्प्यात आहेत.
First published:

Tags: Agriculture, Business News

पुढील बातम्या