Home /News /money /

कोरोना काळात Mutual Funds देत आहेत खास योजना, गुंतवणूक केल्यास मिळेल मोफत विमा

कोरोना काळात Mutual Funds देत आहेत खास योजना, गुंतवणूक केल्यास मिळेल मोफत विमा

म्यूचुअल फंड - SEBI ने मल्टीकॅफ म्यूचुअल फंडसाठी असेट अलोकेशन नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता फंड्सचा 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असणार आहे, जो आता किमान 65 टक्के आहे.

म्यूचुअल फंड - SEBI ने मल्टीकॅफ म्यूचुअल फंडसाठी असेट अलोकेशन नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता फंड्सचा 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असणार आहे, जो आता किमान 65 टक्के आहे.

कोरोना काळात गुंतवणूक आणि बचत या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी (Mutual Fund Companies) एसआयपीमार्फत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोफत विमा संरक्षण (Free Insurance Cover) देण्यास सुरुवात केली आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 02 मे: कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात अनेकांची सध्या घरातील बचत वाढली आहे. त्याच वेळी,आरोग्यविमा (Health Insurance), टर्म इन्श्युरन्स (Term Insurance) आणि आयुर्विम्याची (Life Insurance) यांची मागणीही वाढली आहे (Insurance Demand Increased). तसंच गेल्या एका वर्षात लोकांनी मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Funds) सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या माध्यमातून गुंतवणूक वाढवली असल्याचंही स्पष्ट झालं आहे. लोकांनी आपलं तसंच आपल्या कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आयुर्विमा आणि आरोग्यविमा योजनांमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी (Mutual Fund Companies) एसआयपीमार्फत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोफत विमा संरक्षण (Free Insurance Cover) देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, विम्याची रक्कम एसआयपीची रक्कम आणि कालावधीच्या आधारे ठरवली जाते. हे वाचा-कोण होणार एअर इंडियाचा नवा मालक! टाटा आणि स्पाईसजेटमध्ये शर्यत, किती लावली बोली? या कंपन्या देत आहेत एसआयपीसोबत मोफत विमा संरक्षण पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, एसआयपी इन्श्युरन्स आणि आदित्य बिर्ला सन लाइफ सेंच्युरी या कंपन्यांनी एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना विनामुल्य विमा संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणुकदारांनी या फंड हाउसच्या एसआयपी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्यांना गट विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय तपासणी शिवाय विम्याचा लाभ मिळू शकेल. एसआयपी सुरू करताना या विनामूल्य विमा संरक्षणाचा पर्याय निवडता येतो. बहुतांश फंड हाउसेस आपल्या इक्विटी (Equity) आणि हायब्रीड (Hybrid Scheme) योजनांवर हा लाभ देत आहेत. 18-51 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकदारांना विमा संरक्षण या फंड हाउसेसच्या ठराविक योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍या 18 ते 51 वर्षांच्या गुंतवणुकदारांना एसआयपीबरोबर विमा मिळत आहे.हे विमा संरक्षण 55 वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. एखाद्या गुंतवणूकदारानं वयाच्या 51 व्या वर्षी 10 वर्षांसाठी एसआयपी सुरू केली तर 55 वर्षे वयापर्यंत त्याला विमा संरक्षण मिळेल. काही कंपन्या 60 व्या वर्षापर्यंत हे विमा संरक्षण देत आहेत. म्युच्युअल फंड कंपन्या पहिल्या वर्षी एसआयपीच्या रकमेच्या 20 पट विमा देत आहेत. दुसऱ्या वर्षी 75 पटआणि तिसऱ्या वर्षी 120 पट विमा संरक्षण देत आहेत; मात्र ही विमा रक्कम जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंतच असू शकते. हे वाचा-कमी पैशात दुप्पट फायदा, LICच्या या योजनेत एकदा गुंतवणूक करून मिळवा चांगला रिटर्न एसआयपीमध्ये किमान 3 वर्षे गुंतवणूक केल्यानंतरच मिळणार लाभ एखाद्या व्यक्तीनं दरमहा 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली तर पहिल्यावर्षी त्याला 20 पट म्हणजे एक लाख रुपयांचे विमा संरक्षण असेल. दुसर्‍या वर्षी 75 पट म्हणजेच 3 लाख 75 हजार रुपये विमा संरक्षण मिळेल. तिसर्‍या वर्षी 120 पट म्हणजे 6 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल. गुंतवणुकदाराचा तिसर्‍या वर्षात काही कारणानं मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला म्युच्युअल फंडाच्या युनिट्ससह विम्याची रक्कमही मिळेल. मात्र गुंतवणुकदाराला एसआयपीद्वारे किमान 3 वर्षे नियमित गुंतवणूक करावी लागेल. तीन वर्षांपूर्वी एसआयपी बंद केल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही. तीन वर्षांनंतर एसआयपी बंद केल्यास विमा संरक्षण मिळेल; पण विम्याची रक्कम कमी होईल.
First published:

Tags: Investment, Money

पुढील बातम्या