मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुंबईत पेट्रोलचे दर 'जैसे थे'च; डिझेलच्या दरातही वाढ, ग्राहक त्रस्त

मुंबईत पेट्रोलचे दर 'जैसे थे'च; डिझेलच्या दरातही वाढ, ग्राहक त्रस्त

Petrol-Diesel Prices: दोन दिवसांनंतरही पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Prices: दोन दिवसांनंतरही पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Prices: दोन दिवसांनंतरही पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही.

मुंबई, 30 मे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दोन दिवसांपूर्वी पेट्रोलनं (Petrol price) शंभरी गाठली आहे. दोन दिवसांनंतरही पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोलचे (Thane and Navi Mumbai) दर 100 रुपयांच्यावर आहेत. आज प्रति लिटरसाठी ग्राहकांना 100.19 असे पैसे मोजावे लागत आहेत. डिझेलच्या किंमतीने देखील उच्चांकी गाठला आहे. मुंबईत डिझेलचे दर (Diesel price) 92.17 रुपये आहे. शनिवारी असलेल्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही. देशाच्या आर्थिक राजधानीत ग्राहकांना पेट्रोलसाठी 100 च्यावर रुपये मोजावे लागत आहे. शनिवारी शहरात पेट्रोलचे दर तीन आकडी झाले आणि आज आकडा 100.19 रुपयांवर गेला आहे.

हेही वाचा- चांगली बातमी: देशातल्या कोरोना व्हायरसबाबत मोठी अपडेट

चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोलची किंमत अनुक्रमे 95.51 रुपये आणि 93.97 रुपये आहे. सतत होणाऱ्या पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त झालेत. काही दिवसांच्या फरकाने देशात इंधनाचे दर वाढले जाताहेत.

हेही वाचा- मोठी बातमी: मेहुल चोक्सीचा डोमिनिकाच्या तुरुंगातला EXCLUSIVE फोटो

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे डिझेलचे दर अनुक्रमे 89.49 रुपये, 92.17 रुपये, 89.65 रुपये आणि 87.74 रुपये प्रति लिटर आहे. रविवारी म्हणजेच आज पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही आहे. गेल्या 15 दिवसांपासून इंधनाचे दर जैसे थेच आहेत. तसंच इंधनाचे दर हे मे महिन्यात गेल्या 15 दिवसात वाढले आहेत.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol Diesel hike, Petrol price