नवी दिल्ली, 30 मे: गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus 2nd Wave) देशात हैदोस घातला आहे. रोजचे नवे लाखो रुग्ण आणि हजारांच्या आकड्यात होणाऱ्या मृत्यूंमुळे देशाची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. मात्र आज देशवासियांना दिलासा देणारी बातमी आहे. समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यापासून दररोजच्या नव्या रुग्णांचा आकडा आटोक्यात आला आहे. 7 दिवसांच्या सरासरीनुसार रुग्णांचा आकडा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. (Corona Virus Updates) 8 मे 2021 ला कोरोनानं कहर पाहायला मिळाला. या दिवशी 3 लाख 91 हजार 263 रुग्ण आढळून आले होते. मात्र शनिवारी 1 लाख 95 हजार 183 नव्या रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच 8 मे रोजीच्या तुलनेत हा आकडा 50 टक्क्यांनी कमी आहे. कोरोनाची पहिली आण दुसरी लाट यात तुलना केल्यास यावेळी तीन आठवड्यात नव्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. गेल्या वर्षी यासाठी 6 आठवडे लागले होते. पहिल्या लाटेत 17 सप्टेंबरला सर्वात जास्त 93 हजार 735 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 30 ऑक्टोबरला नव्या रुग्णांची संख्या निम्मी झाली होती. हेही वाचा- मेहुल चोक्सीला मायदेशी आणण्यासाठी भारतानं उचललं ‘हे’ मोठं पाऊल मृतांचा आकडाही कमी कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 7 दिवसात सरासरी मृतांचा आकडा पाहिल्यास तो 18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 16 मे रोजी 4 हजार 40 रुग्णांचा मृत्यू कोरोनानं झाला होता. मात्र सध्या ही संख्या 3 हजार 324 च्या वर आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांचा आकडा सध्या 3 हजारच्या खाली येत नाही आहे. शनिवारी 3 हजार 80 रुग्णांचा मृत्यू झाला. हेही वाचा- वाईट बातमी: विषारी दारू प्यायल्यानं 25 जणांचे संसार उद्ध्वस्त
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







